दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- शहरात लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या हस्ते लहुजी शक्ती सेना माहिला शाखेचे उदघाट्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात फलकाचे अनावरण करुन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे याचे स्वागत गोलाई चौकात फटाक्यांची आतिषबाजी करुन करण्यात आले. तसेच त्यांना वाजत गाजत शहरातील मुख्य रस्त्याने आण्णाभाऊ साठे चौकात आणण्यात आले. इथे शाखा उदघाट्न झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माहिला पदाधिकारी यांच्या नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उस्मानाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष माहिला आघाडी अश्विनी साठे भूम तालुका अध्यक्ष द्रौपदी कसबे,शहराध्यक्ष आम्रपाली राजगुरू,सचिव सुरुची साठे, शहर संघटक छाया काळे,शहर कार्याध्यक्ष राधा पवार,शहर उपाध्यक्ष राजुबाई मंजुळकर,शहर संघटक मीनाक्षी चव्हाण,शहर सचिव भाग्यश्री शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना विष्णू कसबे यांनी लहुजी शक्ती सेना ही अराजकीय संघटना असून आपण समाजाच्या प्रश्नावर लढा देतो. तसेच जिथे अन्याय होईल त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी संघटना काम करते. त्यांनी सर्व माहिला पदाधिकारी यांचे लहुजी शक्ती सेनेत स्वागत केले व कधीही आम्ही पाठीशी आहोत आपण समाजासाठी कार्य करत राहू अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, माहिला नेत्या मायाताई लोंढे, कैलास खंदारे, संतोष मोरे, रोहित खलसे, कळबचे नेते विकास गायकवाड, तसेच भूम शहरातील माहिला मोठया संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमच्या शेवटी राष्ट्रगीत घेऊन सांगता झाली.