दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार, समाजसुधारक हभप श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर (देशमुख )यांचे लोहा येथे लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ भव्य किर्तनाचे आयोजन शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय जूना लोहा येथे आयोजित करण्यात आले होते.
या किर्तनात हभप श्री इंदुरीकर महाराज यांनी अनेक मुद्यांवर चौफेर मार्गदर्शन करीत नागरिकांनी लग्नातील खर्च कमी करुन समाजातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना वह्या पेना वाटप कराव्यात ,तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे ,शेतकरी वर्गानी शेतीबरोबर जोड व्यवसाय करावा, शालेय विद्यार्थ्यांंनी वाचन वाढवले पाहिजे तसेच धर्म आणि संस्कृती टिकवणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, सर्व नगरसेवक, राजकीय पक्षातील अनेक कार्यकर्ते या सर्वांनी मिळून लोह्याच्या परंपरेप्रमाणे हभप इंदुरीकर महाराज यांचा ५५ किलो खारीक खोबऱ्यांचा हार घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी पुढे प्रबोधन करताना हभप श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले की, पदवीधर शिक्षकांपेक्षा ग्राम पंचायतीचे मतदार हुशार आहेत पदवीधर शिक्षकांचे दोन हजार मतदान बाद होते तर ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत एक ही मतदान बाद होत नाही . ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत १०० टक्के मतदान होते तर पदवीधर शिक्षक मतदार संघासाठी ७० ते ८० मतदान होते या शिक्षकांना लाख – लाख रुपये घेऊन मतदान करता येत नाही .
तसेच समाजाला व्यसनीता ही किड लागली आहे दारु पिणाऱ्या मुलांचे लग्न त्यांच्या आई वडीलांनी करु नये कुणाच्या मुलीचे जीवन खराब करु नये.
आपली संस्कृती मागे पडत आहे आपल्या मुलांना व बायकांना मोबाईल देऊ नका त्यामुळे मुलांचा अभ्यास बुडतो आईला जर मोबाईल दिला नाही तर ती आपल्या मुलांना चांगले शिकवेल चांगले वळण लावेल. , संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी , संत तुकाराम महाराजांची गाथा, महामनवाचे जीवन चरित्र वाचायला द्या मुला- मुलींना चांगले संस्कार द्या.
लग्नात ग्रंथ भेट द्या , मोबाईलचा वापर कमी करा आदी चौफेर प्रबोधन केले. लोहा नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळींनी कार्यक्रमांचे चांगले आयोजन केले आहे एखाद्या राजकीय पुढाऱ्यांना
एवढी मोठी गर्दी जमवायला २५ लाखांच्या वर खर्च येत होता पण येथे आलेले भक्तगण हे मोफत आलेत ही त्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे.
यावेळी कार्यक्रमाला नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष राम सावकार सुर्यवंशी, गंगाधर सावकार सुर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर , माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, नगरसेवक जीवन पाटील चव्हाण नगरसेवक बबनराव निर्मले नगरसेवक भास्करराव पाटील पवार, नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक बालाजी खिल्लारे ,नगरसेवक संदीप दमकोंडवार , नगरसेवक अमोल व्यवहारे, भीमराव पाटील शिंदे, भारत पाटील पवार, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष श्रीकांत वसंतराव पवार, सुधाकर पाटील पवार, मिलिंद पाटील पवार, नामदेव सावकार कटकमवार ,केतन भाऊ खिल्लारे , चंद्रकांत दमकोंडवार यांच्या सह आयोजक पत्रकार केशव पाटील पवार, पत्रकार बाळासाहेब कतुरे, गणेश पाटील पवार, संजय पाटील चव्हाण, नवनाथ पाटील पवार, अंकुश पाटील पवार ,गजानन पाटील पवार ,हनुमंत पाटील मोरे ,रमेश पाटील पवार, प्रकाश पाटील पवार ,रेशमाजी दांगटे ,सचिन कोटे , गुलाम शेठ , शिवराज दाढेल संतोष मुंडे ,विनोद चंदेवाड ,पांडुरंग रहाटकर ,नागेश संगवे , काशिनाथ शेटे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम सर यांनी केले यावेळी सर्व पत्रकार, व्यापारी, नागरिक महिला भगिनी यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते .