दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा शहरात १ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित ठिकाणी पुतळा बसत असताना नगरपालिका प्रशासनाने आचारसंहितेचे कारण सांगू छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा पुतळा बंदिस्त करून ठेवलेला १९ फेब्रुवारी पूर्वी नियोजित ठिकाणी बसवा ६ फेब्रुवारी लोहा नगरपरिषद कार्यालयासमोर अमर उपोषणाला शरद पाटील पवार, पंकज परिहार ,अकबर मौलाना, व्यंकट घोडके ,उत्तम महाबळे उपोषण सुरू असताना मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी १६ फेब्रुवारी या सर्वसाधारण सभेत पुतळा समितीच्या समोर विषय ठेवून
पुतळा समितीचा निर्णय आपल्याला लवकरच कळवण्यात येईल असे उपोषणकर त्यांना आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.
अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने १९ फेब्रुवारी च्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित ठिकाणी न बसविल्यास २० फेब्रुवारी सकाळी ११ वाजता आत्मदहन करण्याचा इशारा छावाचे जिल्हा उपाध्यक्ष राम आनकाडे, कंधार तालुका अध्यक्ष संदीप तोंडचिरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना नियोजनामार्फत दिला आहे. आंदोलना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत अजय मोरे यांच्यासह माजी शिक्षण सभापती संजय क-हाळे,माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, काँग्रेस कंधार तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे, सतीश देवकते, दत्ता शिंदे ,आर पी आयचे सुरेश महाबळे, मन्याड फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष खंडू पवार, मुरंबी च सरपंच राम पवार, गजानन मोरे, दिगंबर डिकळे,तुळशीराम लुंगारे, भूषण दमकोंडवार, कपिल किरवले, विक्रांत नळगे ,अमोल महामुने तालुक्यातील सरपंच ,उपसरपंच विविध संघटना व शिवप्रेमींनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.