दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
पालघर/जव्हार: सोनाक्षी कला सेवा संस्थेने वाडा तालुक्यातील गालतरे येथे आयोजित केलेल्या नवे चित्रपट,गीते आणि मालिकेतील कलाकारांसाठी पुरस्कार २०२३-२४ सोहळ्यात कला फाउंडेशन,जनजाती विकास मंच आणि युवा सामर्थ्य प्रतिष्ठान प्रस्तुत जव्हार तालुक्यातील वीर बिरसा मुंडा या गौरव गीताला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या गीताचे निर्माते नरेश मराड,दिग्दर्शक संतोष बांबरे,गायक जगदीश भुसारा,गीतकार राजेश गवई,कॅमेरामन एकनाथ वाघ आणि वीर बिरसा मुंडा यांच्या वेशात काम करणारे कलाकार यशवंत तेलम व सहकलाकार ग्रुपने एकत्रित केलेल्या स्वतंतपूर्व काळातील उत्तमरित्या अभिनय कलेचे सादरीकरण केले होते.गीतातील कलाकारांच्या कलेची दाखल घेत या गीताला पुरस्कार मिळाला आहे.ग्रामीण भागातील या कलाकारांनी आपल्याला येणाऱ्या अनंत अडचणींचा सामना करून हे गीत साकारले असून या गीताला वडोली येथील सरस्वती महिला बचत गटाचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले.मिळालेल्या या पुरस्काराने चहूबाजूने या गीताच्या टीमवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.