दैनिक चालु वार्ता प्रतीनीधी – अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा)प्रतिनिधी: तालुक्यातील श्री क्षेत्र साहूर येथील भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रम द्वारा राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर आधारीत देण्यात येणारी ग्रामगीताचार्य ही पदवी मिळविण्यासाठी आता गावोगावचे सरपंच पुढे आले असून तृतियपंथीही मागे राहिले नाही.संपुर्ण महाराष्ट्रासह वर्धा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र साहूर येथे दि.५ फेब्रु.२०२३ ला मानव जोडो गुरुदेव सेवामंडळ द्वारा ग्रामगीतेवर आधारीत परीक्षा घेण्यात आली.त्यामध्ये सरपंचासह अनेक मान्यवर परीक्षेला बसले असून महाराष्ट्र राज्य किन्नर विकास महामंळाच्या सदस्य व नागपूर च्या अध्यक्ष सुश्री.राणी ढवळे महाराष्ट्रातून प्रथमच परीक्षेला बसल्या असून त्या तृतियपंथ्यामधून पहिल्या ग्रामगीताचार्य होणार आहे.
अ.भा.श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रमचे आजीवन प्रचारक रमेशचंद्र सरोदे याचे मार्गदर्शनात जेष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत साहूर च्या सरपंच -भावना राजेश खरडे ,माजी सरपंच-वनिता दशरथ लवणकर,किर्तनकार सविता बोंदरे,अश्विनी राऊत,शुभांगी दंडाळे,वैभवी प्रशांत काकपूरे,वैशाली व दिपक खरडे,ऊज्वला व राजकुमार दंडाळे,शिल्पा व गोपाल चांदुरकर,रुपाली विनय तळहांडे,दिपक काकपूरे,रुपेश पेठे, हर्षल गोहत्रे,रुपाली राऊत,योगीनी वानखडे,आकाश पाटमासे, वैभव दळवी,ज्ञानेश्वर घोटकर,श्वेता भोरे,समिक्षा घोटकर,वंदना गोंधळे,रोषणी चांदुरकर,अंकिता बोंदरे,गुंजन दंडाळे,राजेंद्र काटोले,हर्षल गोहत्रे,दर्शन बोंदरे यांचेसह अनेकांनी ही परीक्षा दिली.
बोरगाव(टूमनी) चे मुख्या.लक्ष्मीकांत काकपूरे,सुनील मानापूरे,गायत्री भेंडेकर,कू.रेणूका कथलकर,दुर्गा कांबळे,शोभाताई राठी,जयश्री ढोले,प्रशांत ढोले,युवराज ढोले,वर्धपूरच्या सरपंच -संगीता गिरधर निंभोरकर,लक्ष्मण सनेसर,गणेश पचारे व चे मुख्या.राहूल टुले,रविन्द्र वडस्कर,अभिजीत भोंड,ईंदु ठवळे यांचेसह अनेकांनी सहभाग घेतला.