दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना तालूका वडगाव
वडगाव :- वडगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच सूदर्शन भाऊ डवरे यांनी गावातील लोकांच्या समस्या लक्षात घेऊन गावातिल नागरीकांना पीण्याच्या पाण्याची समस्या भासत आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना जनावरांना पाणी पाजण्यासाठी पण अडचण होणार नाही व पाण्याची समस्या सोडवण्यासाठी वडगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच सूदर्शन भाऊ डवरे यांनी बरेच दा धावपळ केली आणि त्यांच्या मागणीला यश मिळाले ,
वडगाव ग्रामपंचायत च्या माध्यमातून वडगाव गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बोअरवेल बसवण्यात येत आहे या साठी दि ६/०२/२०२३ सोमवार ला बोअरवेल कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल आणि लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले सूदर्शन भाऊ डवरे उपसरपंच म्हणून निवडून आले तेव्हापासून वडगाव गावांमध्ये गाव दूरूस्ती , काग्रेट रोड, शाळा सूधारणा, बोअरवेल कामांचे भूमिपूजन अश्या अनेक विकास कामाला गति मिळाली आहे या मध्ये वडगाव ग्रामपंचायत चे प्रथम सरपंच कु स्मिता किंन्नाके यांचं सूध्दा खूप मोठ योगदान आहे तसेच ग्रामविकास अधिकारी सारिका धात्रक मॅडम आणि ग्रामपंचायत सदस्य कैलास भाऊ मेश्राम यांचे सूध्दा गावाच्या विकासासाठी खूप मोठे योगदान आहे, या प्रसंगी वडगाव गावची प्रथम नागरिक कु स्मिता किंन्नाके सरपंच, सूदर्शन भाऊ डवरे उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी सारिका धात्रक मॅडम, ग्रामपंचायत सदस्य कैलास भाऊ मेश्राम, ग्रामपंचायत इतर कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते