दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी-शहाबाज मुजावर.
शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद अधिविभागाची शैक्षणिक सहल मुंबई येथे सुरू आहे. सहली दरम्यान आज (दि.७) महाराष्ट्र राज्याच्या राजभवनला भेट दिली यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली
मुंबई येथील आयोजित शैक्षणिक सहल दरम्यान आज राजभवन, महाराष्ट्र येथे भेट देण्यात आली.नागेश रोडेवाड यांनी राजभवनचा इतिहास सांगितला.
भेटी दरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संवादा दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. तसेच लिखाण करण्यासाठी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत मार्गदर्शन केले. त्यांनी येत्या काळात जनसंपर्कात असणार्या संधीबद्दल माहिती दिली. त्यासोबत राज्यपालांच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती दिली.