दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे …
मुखेड सा.वा आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते तथा माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी तालुका मुखेड येथील विद्यार्थी प्रिय शिक्षक उत्तमराव हनमंते हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा समता समाज संघाचे जिल्हाध्यक्ष के.एच.हसनाळकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
उत्तमराव हनमंते हे 32 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व समता समाज संघाच्या वतीने त्यांचा यथोचीत सह पत्नीक आहेर देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी के.एच. हसनाळकर हे होते यावेळी डी.डी. वाघमारे,डी.पी.वाघमारे, मोहन गवळे ,बाबुराव होनवडजकर, एम. बी. गायकवाड ,आरपीआयचे तालुकाध्यक्ष गोवर्धन पवार ,डी.जे वाघमारे, कवठेकर सोनकांबळे पांडुरंग, प्राध्यापक एस ,के सोनकांबळे, सिद्धराम पाळेकर ,सुशील पत्की यांची उपस्थिती होती यावेळी सेवानिवृत्त शिक्षक उत्तमराव हनमंते यांचा सत्कार के.एच.हसनाळकर यांनी केला या सत्काराला उत्तर देताना उत्तमराव हनमंते मनाले की या पुढचे जीवन मी आंबेडकर चळवळीसाठी व समाजासाठी समर्पित करणार आहे.