दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा ८ नोव्हेंबर
२०१६ रोजी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा करीत जुन्या हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद ठरविल्या. यावेळी दोन हजारांची नवी गुलाबी नोट चलनात आली. परंतु सुरुवातीला काही दिवस व्यवहारात वापरल्या जाणारी दोन हजाराची नोट व्यवहारात दिसेनासी झाली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयाने सहा वर्षांपूर्वी दोन हजाराची नोट चलणात आली होती. सुरुवातीच्या काळात दोन हजारांची नोट व्यवहारात बऱ्यापैकी वापरल्या जात होती. सर्वसाधारणपणे इतर नोटा चलनात दिसत असल्या तरी ग्रामीण भागात दोन हजारांची नोट चलनातून गायब झाली आहे. दोन हजारांची नोट चलनात आल्यानंतर या गुलाबी नोटासद्धा चलनात.मोठ्या प्रमाणात दिसून येत होत्या. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून ग्रामीण भागात दैनंदिन व्यवहारात दोन हजारांच्या नोटा खिशात दिसेना, बँकेत दिसेना गायब झाल्या आहेत. त्यामुळे दोन हजारांची नोट गेली तरी कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दोन हजारांची नोट दिसेनासी झाल्याने आर्थिक व्यवहार करताना अनेकांना अडचणी येत आहेत. बँकेच्या दैनंदिन व्यवहारात तसेच एटीएममधून सुद्धा ग्राहकांना ५००, २००, १००, ५० रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. दोन हजारा- “ची नोट बाजारात दिसत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक दोन हजारांची नोट देखील चलनातून बाद होणार असल्याचा तर्क लावित आहेत. ग्रामीण भागातील अनेकांनी दोन हजारांची नोट काही महिन्यांपासून बघितली नसल्याचे सांगितले जाते आहे.