दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.. मंठा..शहरातील जालना जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा मंठाच्या तिजोरी उघडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला माञ तिजोरी मजबूत जाड लोखंडाची असल्याने तिजोरी फोडण्यात चोरट्यांना अपयश आले.वयामुळे चोरट्यांच्या हाती काहि लागले नाही.बॅंकेला सेक्युरेटी गार्ड नाही यावेळी माञ शेतकऱ्यांच्या ठेवी वाचल्या पण बॅंक प्रशासनाने तातडिने सुरक्षेच्या दृष्टिने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्याक्त होत आहे.
सविस्तर बातमी अशी कि श्रीधर ज्ञानेश्वर सरकटे शाखाधिकारी जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा मंठा यांनी पोलीसांना दिलेली माहिती अशी कि ते जालना जिला मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा मंठा येथे २०११ पासून कार्यरत आहे बॅंकेत शासनाच्या विविध अनुदानाची रक्कम, बचत खाते, मुद्दत ठेव खाते आदि खात्यातील रक्कम काढणे व जमा करणे असे आर्थिक दैनंदिन व्यावहार होत असतात .तसेच उपशाखा तळणी,दहिफळ, जयपुर या शाखांना कॅश पुरवली जाते.त्यासाठी मंठा शाखेमध्ये १५ लाख रूपये ठेवण्याची मर्यादा आहे.व सध्या बॅंकेची अलार्म सिस्टम बंद असून बॅंकेला सेक्युरेटी गार्ड देखील नाही.
( ता.५ ) रोजी रविवार असल्याने बॅंकेतील शिपाई गंगाधर किसनराव वाघमारे यांनी व्हाऊचर बांधणीचे काम करून संध्याकाळी ०५ :०० वाजता बॅंक बंद केली.व त्यानंतर ( ता.०६ ) सोमवार रोजी सकाळी ०८:३० वाजता नेहमी प्रमाणे शिपाई गंगाधर वाघमारे यांनी बॅंक उघडली असता बॅंकेच्या पाठिमागील लोखंडी गेट उघडे दिसले.
म्हणून गंगाधर वाघमारे यांनी लगेच शाखाधिकारी श्रीधर ज्ञानेश्वर सरकटे यांना फोन करून कळवले .त्यावरून शाखाधिकारी श्रीधर सरकटे हे लगेच बॅंकत पोहचले.तेथे पाहिले असता बॅंकेच्या पाठिमागील लोखंडी गेटचे लाॅक तुटलेले दिसले व गेट उघडून बॅंकेत जावून पाहिले असता बॅंकेच्या दोन रूमच्या दरवाज्याला लावलेले लाॅक तोडून कोंडा कापलेला दिसला.आतील दोन तिजोरी ठेवलेले शटर वर करून तिजोरीच्या लाॅकला छेडछाड करून ते उघडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु दोन्ही तिजोरी जाड लोखंडाच्या मजबूत असल्याने त्या उघडल्या नाहीत.या प्रकरणी शाखाधिकारी श्रीधर सरकटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि शिंदे हे करीत आहेत.
चौकट
बँक व्यवस्थापकांना सी.सी.टी.व्ही कॅमेरे तिजोरी आलाराम सिक्युरिटी गार्ड लावणे बाबतच्या सूचना दिले आहेत जेणेकरून चोरीचा किंवा काही अनर्थ प्रकार झाल्यास नागरिक सतर्क होऊन पोलिसांशी संपर्क करतील व काही अनर्थ होणार नाही. शहरातील सर्व बँकेत सी.सी.टी.व्ही कॅमेरे, तिजोरी आलाराम, सिक्युरिटी गार्ड, या सोयी सुविधा आहेत मात्र या बँकेत नाही. याबाबतचे सर्व सूचना बँक व्यवस्थापकांना दिले आहेआहे.
संजय देशमुख (पोलीस निरीक्षक मंठा)