दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर: नायगाव तालुक्यात वन विभागाचे अधिकारी
मिली भगत असल्यामुळे कर्मचा-याच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षित कारभारांमुळे अवैध लाकडाचा साठाच साठा नायगाव तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून खुलेआम अवैधरीत्या वृक्षतोड करून तोडलेल्या अनेक वृक्षाची लाकडे ट्रॅक्टर च्या साह्याने आणल्या जाते व नायगाव शहरातील पिंपळगाव शिवारात भरगच लाकडाचा साठा करण्यात आला आहे.
येथील चारही राज्य महामार्गावरुन विना अडथळा राजरोसपणे वाहतुक करुन पिंपळगाव शिवारात मोठ्या प्रमाणात स्टॉक करुन ते तेलंगणा व कर्नाटकात पाठविण्याचा गोरख धंदा सुरू असल्याचे विदायक चित्र सध्या दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नायगाव तालुक्यात होत असलेली वृक्षतोड थांबवावी अशी मागणी जनतेतून होत आहे.शासनाने एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असा नारा देत असला तरी दर वर्षी झाडाच्या संगोपन करण्यात येते माञ नायगाव तालुक्यातील विना अडथळा अवैध लाकूडाची तस्करी करुन ते तालुक्यातील पिंपळगाव शिवारात मोठ्या प्रमाणात स्टॉक करुन ते एका तेलंगणा राज्यातील व्यापा-यांनी खरेदी करुन ते इतर राज्यांत तस्करी केली जात असताना वनविभागाचे अधिकारी माञ जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अवैध वृक्षतोड करणा-या व्यापा-यांचे मनोबल वाढले आहे.
शासनाने एकीकडे झाडे लावा पर्यावरण वाचवा असे सांगत असताना दुसरीकडे यंत्राच्या साह्याने शेकडो झाडाची कत्तल केली जात आहे. या कडे वरिष्ठ अधिका-यांनी वेळीच लक्ष न दिल्यास परीसर वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही असे नागरिकांतून बोलल्या जात आहे.
याबाबत या भागातील वन कर्मचारी व अधिकाऱ्यांना माहिती दिली असता कुठे आहे मला माहित नाही असे वन कमर्चारयाकडून सांगण्यात आले यात वन विभागाचे अधिकारी मिलीभगत असल्यामुळे अधिकारी माञ कारवाई करण्यास टाळाटाळ करतात यात कोणाची मिलीभगत आह, कारवाई करण्यात टाळा टाळ करत असल्यामुळे
वन विभागातील अधिकाऱ्यांवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.