दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
नांदेड.
जि. प .प्रा .शा सायाळ येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराव पाटील धुमाळ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष शंकरराव धुमाळ व सर्व सदस्य सरपंच श्री जगजीवन गायकवाड उपसरपंच होनाजी जामगे चेअरमन विश्वनाथ धुमाळ पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सर्व गावकरी माता भगिनी युवा वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री माणिक भोसले सर यांनी केले व सूत्रसंचालन सौ .मीरा पत्की आणि सौ भाग्यश्री खानापूरकर मॅडम यांनी केले .
शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.