दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी:आज मंत्रालय मुंबई येथे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री.गिरीषभाऊ महाजन यांची भेट घेऊन काही दिवसापुर्वी *देगलूर तालुक्यातील येरगी* येथे मारुती मंदिराच्या पाठीमागे पडझड झालेल्या स्थितीत एका मंदिराचे काही अवशेष आहेत. चालुक्यकालीन शिलालेख नव्याने आढळला असून यात गोविंदरस व भमिकब्बे (चमिकब्बे) यांचा पुत्र पोचरस (बाचरस) याने केशवेश्वर (मितेश्वर) मंदिराला जाळीदार खिडकी व काही अन्य दान दिल्याचा उल्लेख आहे. यात गर्भगृहाचे द्वार असून अंतराळाचे दोन स्तंभ व सभामंडपाच्या चार स्तंभावर हे मंदिर आज उभे आहे. *मौजे येरगी या गावाला तिर्थ क्षेत्राचा दर्जा देण्या संदर्भात देगलूर-बिलोली मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटू मा.आमदार सुभाषराव साबणे साहेब* यांनी मागणी केली त्या बाबत मा.मंत्री मोहदयांनी तात्काळ या संदर्भात उचीत कार्यवाही करण्या संदर्भात नांदेड चे जिल्हाधिकारी साहेबांना पत्र आदेशीत केले. यावेळी मंत्रालय मुंबईत उपस्थित भाजपा जिल्हाउपाध्यक्ष तथा येरगी सरपंच संतोष पाटील उपस्थित होते.