दैनिक चालु वार्ता रायगड / म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तथा आमदार अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी व शारिरीक आरोग्य, विषयी समस्याचे निराकरण करण्यासाठी व साहित्य वाटप करण्यात आले. या आमदार अदिती तटकरे यांनी मुलींच्या शारिरीक समस्या विषयी मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या विषयी डॉक्टर चा सल्ला घ्यावा असे सांगितले
या वेळी श्रीमती छायाताई म्हात्रे, माजी सरपंच रियाज फकीह, सोनल घोले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष शाहनवाज उकये, उपसंघटक अबिद उकये, रियाज घराडे, शिवदास कडू मुख्याद्यापक श्री बंदरकर, श्रीमती बंदरकर, श्रीमती गावित, श्रीमती बागवान, मुख्याद्यापक श्री अकोळकर सर मुख्याद्यापक श्री संदीप कांबळेकर, श्री अंगद कांबळे विद्यार्थिनी उपस्थित होते