दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे…
मंठा
मन शुद्ध असेल तर कुठेही समाधान लाभते, पापी मनाने कितीदा ही अन् कोणत्याही नदीत स्रान केले तरी समाधान लाभत नाही, असा विचारच संत रविदासांचा मानस होता ‘मन चंगा तो कठोती मे गंगा’ संत रविदासाच्या वाणीतून आलेले हे शब्द तंतोतंत खरी आहे. माणसाचे मन पवित्र किंवा निखळ मनाने पाहिले तर कुंडातही गंगा दिसू शकेल, केवळ तशी दृष्टी जोपासायला पाहिजे, या विचारधारेतून संत रविदासांच्या विचारांची व्यापकता कळून येते.मंठा शहरामधुन गुरु रविदास महाराज यांची जयंती अगदी भक्ती भावाने चर्मकार समाज बांधव वतीने आयोजित करण्यात आली.छत्रपती संभाजी महाराज चौक मुख्य रस्ता मार्गे भक्ती गीते व जय घोषच्या निनादात.
संत शिरोमणी रविदास महाराज यांची 646 जयंती मोठ्या उत्साहात मंठा शहरात साजरी करण्यात आली छत्रपती संभाजी राजे चौक येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली पुढे शहरातून मिरवणूक काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माधव गायकवाड साहेब नरहरी सोनवणे मराठवाडा संघटक राष्ट्रीय चर्मकार महासंघ, श्री मुजी ठोंबरे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणी श्री बाळासाहेब बोराडे नगराध्यक्ष नगरपंचायत मंठा गटनेते श्री अचित नाना बोराडे,जेके कुरेशी उपाध्यक्ष नगरपंचायत मंठा, महादेव वाघमारे,नगरसेवक श्री दीपक बोराडे,श्री नारायण दवणे, नगरसेवक अरुण वाघमारे, नगरसेवक शरद मोरे श्री विठ्ठल वाघमारे साहेब श्री विष्णुपंत घोडके विठ्ठल वाघमारे कैलास कांबळे प्रल्हाद शेळके विश्वनाथ हनवते मदन आंबुरे हरिभाऊ वाघमारे अंकुश शिंदे क श्रीमती गंगुबाई जालिंदर वाघमारे प्रल्हाद शेळके जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन कांबळे पवन गुजर विष्णू पंढरी पवन गुजर अशोक शिंदे संजय हनवते बालाजी वाघमारे सचिन वाघमारे विठ्ठल जिगे ओम प्रकाश हा नव्हते हनवते सचिन वाघमारे आयोजक श्री अंबादास घायाळ तालुका अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रभू शिंदे तालुका अध्यक्ष कर्मचारी हरिकिशन वाघमारे तालुका सचिव खंडू लहाने भगवान आंबोरे विजय अंभोरे महाप्रसादाचे आयोजक रामभाऊ गवळी व सचिन शिंदे मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बळीराम वाघमारे आभार प्रदर्शन सोपान वाघमारे सर यांनी केले