दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी- शहाबाज मुजावर.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले भूमी पन्हाळा या ठिकाणी तीन दरवाजा परिसर फेरीवाले असोशियन यांनी दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी हेल्थ केअर शिबिराचे विश्वरत्न,डॉ,बाबासाहेब आंबेडकर हॉल मध्ये आयोजन केले होते.. अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम राबवण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न सुरू असतो. अशा उपक्रमामुळे शिबिरास स्थानिक व आजूबाजूच्या खेडे गावातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन लाभ घेतला. हेल्थकेअर ऑर्गनायझेशन मा. चंद्रशेखर बेल्लारी यांच्या संपूर्ण ग्रुपच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.
यावेळी पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी चैतन्यकुमार माळी ,माजी नगराध्यक्ष रूपालीताई धडेल, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी युनियन बँक पन्हाळा चे मॅनेजर पूजा राडे , राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजीव सोरटे, असोसिएशनचे अध्यक्ष, प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष सुषमाताई पन्हाळकर, सरचिटणीस शितल कुमार गवंडी,उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. सतीश पाटील सर यांनी केले. तर स्वागत असोसिएशनच्या अध्यक्षनी केले. तर आभार संग्राम भोसले यांनी मानले