दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनीधी- विष्णु मोहन पोले
हाडोळती- दयानंद विद्यालय, हाडोळती. तालुका अहमदपूर येथील शाळेने आयोजित केलेला दि. 8/2/23 रोजी उमरगा रेतु ता जळकोट येथे शिक्षक- पालक- विद्यार्थी यांचा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जोगदंड आय .एम. (मुख्याध्यापक दयानंद विद्यालय हाडोळती), तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजकुमार पन्हाळे( सरपंच ग्रामपंचायत उमरगा रेतु), उपसरपंच -अंकुश गीते, चेअरमन -श्रीराम ढोबळे, अध्यक्ष शालेय समिती- मोहन केंद्रे ,उपाध्यक्ष शालेय समिती- फजल देशमुख, माजी सरपंच- देविदास सूर्यवंशी, माजी उपसरपंच राम ढोबळे,माजी सरपंच- तानाजी ढोबळे, पोलीस पा.वसंतराव ढोबळे, हारुणमिया शेख,शंकरराव केंद्रे, दयाराम माळी,पर्यवेक्षक कोटसूळवार ए.पी., आदी मान्यवर उपस्थित होते. सदरील मेळाव्यात विद्यार्थी यांच्या अडीअडचणीवर सवाद रूपाने चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांनी पालक ,विद्यार्थी यांना शैक्षणिक विषयावर समायोजित विचार मांडले .अध्यक्षीय समारोप करताना शाळेच्या मुख्याध्यापकांनी आलेल्या अडचणीवर मात करुन ज्ञान प्राप्त करावे. विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी वेळोवेळी सोडवून विद्यार्थ्यांना आदर्श माणूस बनवण्याचा आम्ही प्रयत्न करूअसे उमरगा रेतु येथील पालकांना आश्वासन दिले .एकंदरीत पालक -शिक्षक- विद्यार्थी यांचा मेळावा संपन्न झाला.सदरील मेळावे आदरणीय प्रा. पी .टी. पवार सर अध्यक्ष (किसान शिक्षण प्रसारक मंडळ हाडोळती) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहेत . या मेळाव्यास शिक्षक,गावातील पालक- विद्यार्थी नागरिक ,माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री येरमे एल.व्ही. यांनी केले.