दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर– तीपन्ना नगर येथे बाळासाहेबांची शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त तिपन्ना नगर अहमदपुर येथे बाळासाहेबांची शिवसेना उप जिल्हाप्रमुख गणेश पांचाळ,तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये, शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले, युवासेना तालुकाप्रमुख संगम पाटील या सर्वाच्या वतीने, बाळासाहेबांची शिवसेना लातुर ग्रामीण
जिल्हाप्रमुख गोपाळ भाऊ माने साहेब,यांच्या हस्ते तिपन्ना नगर येथील माता भगिनींना साडी – चोळी वाटप करण्यात आली,
तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले,तसेच महिला स्वावलंबी करणासाठी तंज्ञ
प्रशिक्षक सौ.रेखाताई पांचाळ यांच्या संयुक्त विद्यमाने फुलेनगर येथील आय्या कॅम्पलेक्स मधील आस्था सौदर्य पार्लर येथे
सात दिवसीय बेसिक व अँडव्हास सौदर्य प्रशिक्षण शिबीरांची सुरुवात केले, या प्रसंगी लातुर ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळजी माने साहेबांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सांगितले की समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रगतशील होण्यासाठी व्यवसायात उतरावा,या साठी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन त्यांचा अधिक अधिक अनुभवातुन फायदा घेऊन व्यवसायाकडे वाटचाल करावी, तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा मार्फत जास्तीत गरजु रुग्णांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी म्हणून शहरात आपणास मदत करण्याचे आश्वासन दिले, सरकारी विविध योजना शहरात राबवण्यासाठी प्रयत्न शिल राहिन असे अभिवचन सर्वांना दिले,या प्रसंगी
कामगार सेना जिल्हाप्रमुख किरण गायकवाड,तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये,चाकुर तालुका प्रमुख रवी शिरूरे,युवासेना तालुका प्रमुख संगम पाटील,शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले, उपशहर प्रमुख राजकुमार जाधव(पश्चिम) , उपशहरप्रमुख राहुल गलाले (पुर्व),
नरेश चौथईवाले,सुनील देशमुख,लक्किसिंग बावरी,प्रवीण डांगे, रोहन जाधव,अर्जन लिंबाळे,अमोल गोरे,अनिल चव्हाण, ऋषभ पाटील, योगेश स्वामी, ब्रम्हा सारोळे,
कपिल नाकसाखरे ,राम गायकवाड, तानाजी भगत,अक्षय कदम, हेंमत शिंदे, आदि असंख्य शिवसैनिक
उपस्थित होते. याप्रसंगी सुत्रसंचालन सुनील सर देशमुख यांनी केले या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला व शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता..