दैनिक चालु वार्ता गंगापुर प्रतिनिधि- अमोल आळंजकर
गंगापुर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या शिवशाही पॅनलने दणदणीत विजय मिळवला.भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासह त्यांच्या पॅनलचा पराभव झाला.या निवडणुकीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.गंगापुर येथील श्री मुक्तानंद महाविद्यालयामध्ये सकाळी १९ टेबलवर मतमोजनीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीची मतमोजनी पुर्ण झाली तेव्हा बंब यांचे शेतकरी सभासद कामगार पॅनल ५७१ मतांनी पिछाडीवर होते. दुसर्या फेरीची मतमोजनी तीन वाजता सुरु झाली. ठाकरे गटाच्या शिवशाही पॅनलची आघाडी होती आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनलपेक्षा शिवशाही पॅनलला ९५० मतांची आघाडी मिळाली . अंबेलोहळ,पुरी,लासुर,तुर्काबाद,कायगाव सर्कल मध्ये शिवशाही पॅनलने आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत लासुर स्टेशन गटातुन कृष्णा पाटील डोणगावकर यांनी आमदार प्रशांत बंब यांच्यावर एका मताने आघाडी घेतली होती. गंगापुर सहकारी साखर कारखाना सुरु करण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित पॅनलसमोर आहे