दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी गंगाखेड/प्रेम सावंत.
गंगाखेड: तालुक्यातील मौजे धारासुर येथील प्राचीन ऐतिहासिक राज्य संरक्षित गुप्तेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्री महोत्सवा निमित्त 12 फेब्रुवारी 2023पासून सुरू असलेल्या शिव महापुराण अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वर पारायण शिवमहापुराण कथा हरी किर्तनाची हरीभक्त पारायण मधुसूदन महाराज ठाकुर बुवा दैठणेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने 19 फेब्रुवारी2023 रोजी सांगता झाली.
शिव महापुराण कथा प्रवक्ते वेदाचार्य महामंडलेश्वर मनीष चैतन्य महाराज पुरी मानवतकर यांच्या मधुर वाणीतून भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घेतला. धरासुर येथे संपन्न झालेल्या महाशिवरात्री महोत्सवास धारासुर परिसरासह परभणी जिल्ह्यातील भाविक भक्तांनी शिवमहापुराण कथा शिवनाम किर्तनासह महाप्रसादाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमास परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव, गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुभाष कदम, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी विज्ञान शाखेचे एनआयसी.सुनिल पोटेकर,भरत जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते.
महाशिवरात्री महोत्सव यशस्वितेसाठी गुप्तेश्वर सप्ताह कमिटी धारासुर यांच्यासह निवृत्ती कदम, विक्रम कदम,ज्ञानेश्वर कदम,जयराम कदम, बालासाहेब नेमाने, राजेभाऊ कदम, विष्णू कदम, तुकाराम मोहोळकर,बालुआप्पा कदम,अर्जुन महाराज शिंदे, सुरेश कदम, कृष्णा कदम तसेच धारासुर येथील जय मल्हार मित्र मंडळाचे पदाधिकारी व इतर समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.