दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
========================
दिनांक: २१/02/2023 जी.प.प्रा शाळा शिऊर ता. निलंगा येथे अक्का फाउंडेशन मार्फ़त प्रोजेक्ट आनंदी उपक्रमातर्गत किशोर वयीन मुलीना ऍनिमिया म्हणजे काय?
मासिकपाळी दरम्यान काय काळजी घ्यावी यादरम्यांन आहार कसा असावा याविषयी प्रोजेक्टर द्वारे सविस्तर माहिती देण्यात आली लोहयुक्त व ‘ क ‘ जीवनसत्वयुक्त अन्नाचे सेवन करुण ऍनिमिया टाळता येतो असे सांगितले ‘ती’ ला वडिलांच्या भावनेतुन नाही, तर पाहू या आईच्या अंतकरणातून ही भूमिका फाउंडेशनच्या माध्यमातून पूजा सरवदे प्रणीता केदारे , राहुल ढाले , सचिन सूर्यवंशी यांनी मांडली. याप्रसंगी शाळेततिल महिला शिक्षिका श्रीमती डोंगरे वंदना, इंचूरे मंगल, कोलेवाड संगीता, डीगोळे बबिता, शिवकुमार बिरादार, सुकूमार जढाळे यांनी सहकार्य केले…