दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
कौठा प्रतिनिधी -आज कौठा ता.कंधार येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती कंधार अंतर्गत येथे जागृती महिला ग्रामसंघ कौठा वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रमुख उद्घाटक लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व प्रमुख पाहुण्या शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी आमदार साहेबांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महिला बचत गटांच्या वेगवेगळ्या योजना कश्या पद्धतीने अमलबजावणी केली पाहिजे हे विषद केले व आशाताई बोलताना म्हणाल्या की,महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून समोर येऊन स्वतःच्या पायावर उभे टाकावे यावेळी वेगवेगळ्या बचत गटांना धनादेश आमदार साहेब व आशा ताई यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्चनाताई शिवकुमार देशमुख, बाबुराव देशमुख साहेब, पातेवार सर, सरपंच चौकी हनुमंत पाटील कदम, रणजीत पाटील राऊतखेडकर, शिवकुमार देशमुख, शंकरराव देशमुख, चेअरमन प्रतापराव देशमुख, आझाद ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे,रामदास कापसे,शिवाजी इंदोरे, स्मिताताई विजय देशमुख, बसवेश्वर देशमुख, बसवेश्वर मडके, सचिन कुदळकर, वसंत मंगनाळे, गिरीश डिगोळे, गौतम वाघमारे, परमेश्वर घोरपडे, सोमनाथ कापसे, ओमराजे शिंदे, तेलूरचे सरपंच राजू भंडारे, गोविंद पन्नासे,प्रशांत मोरे,कार्यक्रमास परिश्रम घेणारे विशाल पाटील चिंचोलीकर सह कार्यकर्ते,गावकरी, बचत गटाच्या महिला व महिला उपस्थित होत्या