दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा..
जो कोणी श्री. शिवपुराण श्रध्दा आणि भक्ती पुर्वक श्रवण करतो ऐकतो तो जन्ममृत्यू च्या फेऱ्यातून मुक्त होतो.शिवपुराण कथा आपल्या ओजस्वी वाणीमध्ये ह.भ.प कथा व्यास कू.नयना दिदी नाशिककर म्हणाल्या की, ज्या प्रमाणे समुद्र अमर्याद त्याच प्रमाणे श्री शिव पुराण फार गहीरे आणि खोल आहे.श्री भागवत पुराण मध्ये १८,००० श्लोक तर शिव पुराण मध्ये २४,००० श्लोक बस अंतर एवढेच की,जो समुद्रात डुबतो तो मरतो आणि जो श्री शिव पुराण मध्ये डुबतो तो तरतो एवढे कृपेचे सागर भगवान भोले बाबा आहेत.एकदम साधे आणि सरळ शिव स्वयंभू, शाश्वत,सर्वोच्च, विश्वचेतना, ब्रह्माण्डीय अस्तित्व, आधार,त्याग,तपस्या, वात्सल्य आणि करूणेचे मुर्तीमंत उदाहरण भगवान शंकरजी भोले बाबा होय.जो कोणी श्री शिव पुराण वाचतो श्रवण करतो ऐकतो तो मोक्ष प्राप्त करतो.
यावेळी आरती यजमान प्रल्हादराव बोराडे पाटील, पंजाबसिंह बोराडे,उदयसिंह बोराडे, बाबुराव शहाणे,किसनराव मोरे,विष्णुपंत शहाणे,शिवाजी नगरे,लक्ष्मण शिंदे,बाळासाहेब घनवट,
बाबकाका कुलकर्णी, राजेभाऊ भूतेकर,प्रदीप देशमुख,पप्पू दायमा,उमेश काकडे, डॉ.प्रकाश बोराडे,संजय बोराडे,प्रकाश शेरे,नारायण शेरे,मधुकर लिंबोन,वैभव शहाणे,सचिन चव्हाळ,महेश गोरे,आशिष तिवारी,अतुल खरात,अशोक शेरे,सुरेश बोराडे,राहुल बोराडे,गजानन मालकर,योगेश गनगे,पंढरीनाथ गजमल,गजानन कापसे,विलास राठोड,सुनील ठोके, गणेश बोराडे,भीमराव देवडे,गोविंद भारतीय,सुधाकर टाकले या सह अनेक भक्त उपस्थित होते