दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भू म:- तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील घेण्यात आलेल्या निवडणुकीत जय महंत कीर्तीश्वर ग्रामविकास पॅनलची एक हाती सत्ता आली आहे.महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब,माजी सरपंच गटनेते मा.श्री.विशाल बापू ढगे यांच्या नेतृत्वाखाली जय महंत कीर्तीश्वर ग्रामविकास पॅनल ने एक हाती सत्ता मिळवल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादितच्या चेअरमन पदी दत्तात्रय महादेव ढगे, व्हाईस चेअरमन पदी मुकुंद दत्तू ढगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.