दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:राष्ट्रीय सैनिक स्कूल निवड परिक्षेत ग्रीन व्हॅली इन्टरनॅशनल स्कूल नायगावची चमक. राष्ट्रीय परिक्षा एजन्सी (एन टी ए) मार्फत घेण्यात येणाऱ्या ऑल इंडिया राष्ट्रीय सैनिक स्कूल निवड परिक्षा 2023 साठी शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कनिष्क राहूल भद्रे ने घवघवीत यश संपादन करून ग्रीन व्हॅली इन्टरनॅशनल स्कूल नायगावचे राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेत गुणवत्तेत चमक दाखवली आहे.
अत्यंत अवघड आणि संपूर्ण देशभरातील मुलांचा सहभाग असलेली ही परिक्षा दिनांक 8/1/2023 रोजी घेण्यात आली. त्यात शाळेतील कनिष्क राहूल भद्रे ही परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण होऊन त्याची निवड सातारा राष्ट्रीय सैनिक स्कूल या ठिकाणी झाली आहे.त्याच्या या यशाबद्दल ग्रीन व्हॅली इन्टरनॅशनल स्कूल नायगाव चे सचिव कुमूदकांत पटेल, प्राचार्य सरोज धरणे यांनी कनिष्क राहूल भद्रे व त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक नवनाथ सर, आनंद पांचाळ सर,अर्जुन बैस सर,योगेश पाटील सर, गणेश जांभळे सर व पल्लवी भालेराव यांचे कौतुक करून दरवर्षी ही यशाची परंपरा कायम असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहेत.