दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा)प्रतिनिधी : स्थानिक आष्टी पोलिसांनी वॉश आउट मोहीम राबवून बोरगाव(टु) अप्पर वर्धा धरणाच्या परिसरातील बेटावरील दारू भट्टी पकडून गावठी दारू विक्रेत्यांत घबराहट पसरवून बहादद्दूरी मिळवली याबत असे वर्धा पोलीस अधीक्षक नुरुल हसनआर्वी उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांच्या आदेशानुसार आष्टी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांच्या मार्गदर्शनात नियुक्त पोलिस पथकांनी मौजा बोरगाव(टू) पारधी बेडा अप्पर वर्धा धरण जवळच्या बेट परिसरात लोखंडी ड्रम ६ नग लहान प्लास्टिक ड्रम ९ मोठे प्लास्टिक ड्रम १६+४=२० अश्या एकूण ३५ ड्रम मध्ये एकूण १,३५,००० हजार रुपये किमतीचा सडवा रसायन व १२ हजार रुपये किमतीची १२० लिटर दारू असे एकूण जुमला किंमत १,२७,००० रुपये किमतीचा माल पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आला एकूणच पाहता कारवाई मध्ये इतर वस्तुसह १,४७,०००रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याच्या कारवाईत पोहवा ८९६ पंढरी धुर्वे,संजय बोकडे १७८९, बालाजी सांगळे १७८७, रोशन धाये १६९३ यांच्यासह होमगार्ड पथकाचे योगदान आहे असे पोलीस स्टेशनने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात कळविले आहे