दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
========================
निलंगा : पंचायत समिती अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणक परीचालकांना यावलकर समितीच्या शिफारशी नुसार ग्रामपंचायतच्या सुधारीत आकृतिबंधनुसार कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेकडून आझाद मैदान मुंबई येथे 1 मार्च पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या संबंधीचे निवेदन मंत्रालय मुंबई सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती स्तरावर संपूर्ण महाराष्ट्रातून देण्यात आले आहे. दिनांक 27 फेब्रुवारी पासून राज्य भर काम बंद करून महाराष्ट्रातील संगणक परिचालक आझाद मैदानावर हजेरी लावणार आहेत. त्या संबंधीचे रितसर निवेदन निलंगा पंचायत समिती येते मा. गटविकास अधिकारी अमोल ताकभाते साहेब यांना निलंगा संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे. यावेळस निलंगा संघटनेचे तालुका अधेक्ष सोमवंशी शिवशंकर, आणि संघटनेचे इतर पदाधिकारी गजानन राजापूरे, रवी गायकवाड, विकास गायकवाड, हणमंत पसरकल्ले, दत्तात्रे साळुंके उपस्थित होते. त्याच बरोबर 27 तारखेपासून कोणीही ऑनलाइन काम करणार नाही अशा सूचनाही संघटनेच्या वतीने देण्यात आल्या.