दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यात विविध गावांमध्ये आरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आले होते .कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोर एक जीव घेणी समस्या आहे. हजारो लोक दरवर्षी कर्करोगामुळे मृत्यू पडतात. पहिल्यांदा जेंव्हा कर्करोगाशी सामना होतो तेव्हा एक समज झाला की जे धुम्रपाण करतात किंवा तंबाखू खातात त्यामुळेच कर्करोग होतो. पण हळूहळू पोटाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग अन्य कर्करोग जगासमोर उलगडू लागल्यामुळे जगाला हे समजले की कर्करोग कोणालाही होवू शकतो त्यामुळे कर्करोगाची भिती वाटू लागली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्करोग आपल्या शरीरात असून ही कळत नाहीपण जस जसे वर्ष लोटली तस तसे कर्करोग व त्यावरील उपचार वाढू लागले पण तस तसी आज जन सामान्यात कर्करोगा विषयी जागृती किंवा माहिती नाही.
तसे पाहयला गेले तर मी डॉ. कपील एकलारे व डॉ स्मीता एकलारे आणि माझे पूर्ण कुटुंब वैद्यकीय क्षेत्रात असून सुध्दा माझ्या आईला कर्करोगाची लागन झाली व तेही शेवटच्या टप्यात आहे असे निदान झाल्यामुळे फार काही आईला उपचार लागू पडलेले नाहीत. तेंव्हापासून डोक्यात विचार आला आपण स्वतः डॉक्टर राहून सुध्दा आपल्या आईचे उपचार किंवा निदान लागले नाही. त्यादृष्टीने थोडीशी जनजागृती करावी यासाठी विशेष शिबीराचे नियोजन करायचे ठरविले. त्यानुसार देगलूर व देगलूर परिसरात १० शिबीर घेण्याचे नियोजन करण्याचे ठरविले त्यात.
येरगी येथे दि. ०७.०१.२०२३ रोजी पहिले शिबीर घेण्यात आले त्या एकूण ३० रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात पॅप्स स्मिअर चे ७ रूग्ण आढळेल. २. मरखेल येथे ३८ रूग्णांची तपासणी करून पॅप्स स्मिअरचे ७ रुग्ण, ३. मुक़ामाबाद येथे ८३ त्यात पॅप्स स्मिअरचे १८ ४. हाणेगाव येथे ६० रूग्णांची तपासणी करून पॅप्स स्मिअरचे ५ रूग्ण, ५. आदमपूर येथे १३६ रूग्णांची तपासणी करून पॅप्स स्मिअरचे ११ रूग्ण, ६. तमलूर येथे ५७ रूग्णांची तपासणी करून पॅप्स स्मिअरचे ५ रूग्ण, ७. मदनूर येथे ४२ रूग्णांची तपासणी करून पॅप्स स्मिअरचे ५ रूग्ण ८. जाहूर येथे ४६ रूग्णांची तपासणी केली आणि देगलूर येथे दि. २६.०२.२०२३ रोजी संजीवन वूमन्स स्पेशालिटी हॉस्पीटल येथे २९७ रूग्णांची तपासणी केली त्यात २७ रुग्ण हे पॅप्स स्मिअरचे तपासणी केलेली आहे.
एकूण ७८९ रूग्णांची तपासणी केली असता त्या ८३ पॅप्स स्मिअर रुग्णांची तपासणी केलेली आहे.
त्यापैकी माईल्ड ३०%, मॉडरेट- ५२%, सिव्हीयर १२% तर त्यामध्ये ६% नॉर्मल रिपोर्ट आलेले आहेत.
या शिबीरासाठी नांदेडचे सुप्रसिध्द कर्करोग तज्ञ डॉक्टर आनंद भगत सर यांचे सर्वात मोलाचे योगदान लाभले ते पूर्णवेळ या शिबीरासाठी रूग्णांची तपासणी करत होते. या शिबीरामध्ये रूग्ण आढळल्यानंतर त्यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला देऊन त्यांना आनंद कॅन्सर & मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल नांदेड येथे अत्यंत अल्पदरामध्ये उपचारासाठी सोय करण्यात येईल असे आपल्या मनोगामध्ये सागण्यात आले. तसेच या शिबीरासाठी सोनोग्राफीसाठी डॉक्टर ठोंबरे मॅडम यांनी मोलाची सहकार्य दिलेले आहेत. तसेच देगलूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री डॉ. वलांडे साहेबा यांनी ECG, रक्त तपासणी व पॅप्स स्मिअर मोफत तपासण्या करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत.
या शिबीरामध्ये देगलूरचे डॉ. मच्छिंद्रनाथ देगलूरकर सर, डॉ. हणमन्लू नामावार सर, डॉ. आर. दिक्षीत सर या तीन डॉक्टरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्माणीत करण्यात आले.
या शिबीराचे अध्यक्ष म्हणून डॉ. व्ही. सी. मुंडे हे होते तर प्रमुख पाहूणे मा. श्री. व्यंकटराव पाटील गोजेगावकर (जिल्हा अध्यक्ष भाजपा नांदेड), मा. श्री महेश पाटील (शिवसेना तालुका अध्यक्ष) डॉ. एस. एस. लांडे (वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रूग्णालय, देगलूर) डॉ. आकाश देशमुख (तालुका वैद्यकीय अधिकारी, देलगूर व जिल्हा हिवताप निर्मुलन अधिकारी नांदेड) डॉ. आनंद भगत (कॅन्सर व अॅडव्हान्स लॅपरोस्कोपीक
सर्जन आनंद कॅन्सर & मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल नांदेड) मा. मोगलाजी शिरशेटवार (माजी नगराध्यक्ष ( नपा, देगलूर) मा. लक्ष्मीकांत पदमवार (माजी नगराध्यक्ष, नपा, देगलूर) मा. श्री मुक्ती मुख्तारूद्दीन रफाई (माजी उपनगराध्यक्ष, नपा, देगलूर) हे होते.
या शिबीराचे नियोजन श्री गणेश चितोडे यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री डॉ. लाडके सर व
सुभाष मरखेले यांनी केले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी देगलूर येथील India Medical Association शाखा
देगलूर यांचे सहकार्य लागले तर यासोबत सायलू यम्मलवार व मित्र मंडळ यांनी खूप मोलाचे योगदान दिलेले
आहे. शिवानंद भुताळे आणि संजीवन वूमन्स स्पेशालिटी हॉस्पीटल देलगूर चे संपूर्ण स्टाफ यांचेही सहकार्य