दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर: देगलूर तालुक्यातील दरेगाव येथील हनुमान मंदिराची दानपेटी फोडून नगदी ३ लाख ८३ हजार व चार तोळे चांदी असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उजेडात आली. याप्रकरणी देगलूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील दरेगाव येथील महादेव मंदिराच्या शेजारी उघड्यावर महादेवाची एक पिंड असून, तिचा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी एक मंदिर बांधण्याचे सर्व ग्रामस्थांनी ठरविले आहे. त्यासाठी लोकवर्गणीतून ३ लाख ८३ हजार रुपये रोख रक्कम तसेच चार तोळे चांदी दान स्वरूपात आली होती. मात्र गावकऱ्यांमध्ये मतभेद झाल्याने सदरची रक्कम दहा महिन्यांपूर्वी हनुमान मंदिरातील केली. दानपेटीमध्ये ठेवण्यात आली होती. तसेच हनुमान मंदिराला चारी बाजूने चॅनेल गेट्स असून त्याची साफसफाई व अन्य कामकाजासाठी त्या चॅनेल गेटच्या चाव्या गावातीलच काही व्यक्तींकडे ठेवण्यात आल्या.रोजच्याप्रमाणे सोमवारी २७ रोजी पहाटे काकड आरतीसाठी काही ग्रामस्थ हनुमान मंदिरात आले असता हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडल्याचे निदर्शनास आले. ही बाब मंदिरातील ध्वनिक्षेपकावरून गावकऱ्यांना अवगत
त्यानंतर सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत गजलवार यांनी सोमवारी दुपारी देगलूर पोलिस ठाणे गाठून रीतसर फिर्याद दाखल केली. त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.