
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक व्यंकटराव पाटील पवार सर यांचे प्रदिर्घ सेवेनंतर आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शामसुंदर जहागीरदार ( संचालक ) हे होते तर प्रमुख पाहुणे तु.श. वारकड ( गुरूजी ),प्रमुख उपस्थिती श्री बा.दे.कुळकर्णी ,पुरूषोत्तम देशपांडे,प्रदीप देशमुख ,योगेश वारकड, मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड, पर्यवेक्षक राजीव अंबेकर हे होते .सेवापूर्तीसोहळ्या निमीत्य
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी श्री पवार सर व सौ.पवार मॅडम यांचा शाळेच्या वतीने कपडे रूपी भेट देवून शाल,श्रीफळ,पुष्पहार देवून सत्कार करून निरोप देण्यात आला.पत्रकार भिसे सर, बाजीराव गायकवाड सर यांच्या सत्कार करण्यात आला. सर्वानी सरांना निरोप दिला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक मान्यवराचे व पदाधिकारी यांचे पवार सर यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर मंडळींनी
आपले मनोगत व्यक्त करताना पवार सर म्हणजे हसत खेळत जगणारे आदर्श विद्यापीठ,ऋषी तुल्य व्यक्तीमत्व, सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तीमत्व सर्वांना आवडेल असे व्यक्तिमत्व अशा शब्दात त्यांची प्रशंसा करून त्यांना सेवापूर्तीनीमीत्य निरोप देण्यात आला.यामध्ये प्राध्यापक कटमवार सर बोदेमवाड मुख्याध्यापक, तु.श.वारकड गुरूजी यांनी आपले मनोगतात व्यक्त केले यानंतर सत्कार मूर्ती पवार सर यांनी आपल्या जीवनातील विविध घडामोडींवर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाला सर्वजन उपस्थित राहून सहभागी होऊन मला हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल त्यानी सर्वाचे आभार मानले.आपले असेच प्रेम राहू द्या असे ते यावेळी म्हणाले,त्यानंतर अध्यक्षीय भाषणाने समारोप झाला.
या कार्यक्रमाला आनंदराव लाठकर ( तंटामुक्त अध्यक्ष) रूद्र (संजय ) वारकड ( चेअरमन ) विश्वाभंर मोरे ( पोलीस पाटील )आर.एन.जगताप (माजी मुख्याध्यापक रामप्रताप मालपाणी मुकबधीर वि.नांदेड )डि.के.वकिल.व्हि.जी.कदम( प्राध्यापक ), डॉक्टर प्रविण जगताप, राजेंद्र ताटे,प्रा.डि.जी.कदम. प्राध्यापक मुकुंद बोकारे. चंद्रकांत नागठाणे,बी.एन.पाटदे, बि.आर.गोरे,रमेश कराळे,प्रा . मुंडे,प्रा.भालेराव ,स्वामी सर,एस.पी.जंगमे सर, चक्रधर कदम सर व संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमीक विद्यालय कलंबर शाळेचे शिक्षक प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व समता माध्यमिक व उच्च माध्यमीक विद्यालय उस्माननगर येथील सचिव, उपाध्यक्ष,संचालक मंडळ, मुख्याध्यापक,शिक्षक, प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी ,विद्यार्थिनी ,आप्तेष्ट, नातेवाईक , मित्रमंडळी,गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवापूर्ती सोहळ्याबद्दल हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या कार्यक्रमचे सुत्रसंचालन प्रा. सौ.संजयश्री पाटील ,आभारप्रदर्शन पर्यवेक्षक राजीव अंबेकर यांनी मानले.