दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
————————————————–
अहमदपूर/लातूर:- अहमदपूर तालुक्यातील नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचे अवचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने अहमदपूर शहर व परिसराची स्वच्छता अभियान राबवण्यात आले शहरातील थोडगा रोड महात्मा गांधी कॉलेज ते शिवाजी चौक आझाद चौक ते शिवाजी चौक सावरकर पुतळा या परिसरातील दीडशे च्या वर स्वयंसेवकांनी सफाई अभिमान राबवले सकाळी सात पासून ते नऊ पर्यंत या अभियानात शहरातील अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते झाडू खराटा व नगरपरिषद च्या स्वच्छता अभियानातील गाड्यांचा यात सहभाग होता त्यात स्वयंसेवकांनी रस्त्यावरील सुका कचरा 10 टन तर ओला कचरा 32याचे संकलन करून त्याचे जैविक व अजैविक याच्या मध्ये विभागणी केली व तो कचरा नगरपरिषद च्या गाडीमध्ये टाकून डेपो वरती नेण्यात आला या अभियानात नगरपरिषद चे प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद कुलकर्णी प्रशासक प्रवीण फुलारी यांनी मार्गदर्शन केले या अभियानात भूमिलेख उपाध्यक्ष राजू रोकडे व त्यांच्या स्वयंसेवकांनी अभियान राबवले