दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता. प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
————————————————–
अहमदपूर/लातूर:-अहमदपूर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा शिरूर ताजबंद येथील कॅशियर मन्मथ राचप्पा हेंगणे हे प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा शिरूर ताजबंद च्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेश येसके शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा किनगाव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उघोजक सुर्यकांत उडतेवार सचिन काकडे शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा जळकोट गोविंद पांचाळ मनोहर चामे बि.के.पाटील राजकुमार चव्हाण याची उपस्थिती होती या वेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक लांडगे एस .ए यांनी केले या वेळी बोलताना लांडगे एस. ए म्हणाले की कॅशियर म्हणून मन्मथ राचप्पा हेंगणे यांनी शाखेत खुपच समाधान कारक काम केले असुन आता पर्यंतच्या सेवेत त्यानी प्रमाणीक पणे सेवा बजावली आहे त्यामुळे असा सहकारी सेवानिवृत्त होत असल्याने याची जाणीव आम्हाला निश्चितच शाखेत जाणवणार आहे या वेळी सत्काराला उत्तर देताना मन्मथ राचप्पा हेंगणे म्हणाले की महाराष्ट्र ग्रामीण बॅंक बॅंकेत माझी 38 वर्ष 4 महिने सेवा झाली असुन माझ्या सेवेच्या कार्यकाळामध्ये एक ही चुकीचे काम केलो नाही आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून ग्राहकाची सेवा केलो आहे त्यामुळे मला सेवेचे समाधान लाभले आहे या वेळी अध्यक्षीय समारोप करताना शैलेश येसके म्हणाले की मन्मथ हेंगणे याच्याकडून आम्हाला खुप काही शिकायला मिळाले काम करत असताना नेहमी सतर्क राहून कसे काम केले पाहिजे वेळेचे बंधन आणी कामाचा प्रमाणिक पणा आणी ग्राहकांशी हितसंबंध कसे जपले पाहिजेत हे मन्मथ हेंगणे याच्या कडून शिकण्या सारखे आहे त्याच्या अनुभवाचा फायदा निश्चितच आम्हाला होणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिवाईज वित्तीय साक्षारता केंद्र क्षेत्र समन्वयक दिपक कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अजित पराते यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र वाघमारे राजेश लोलेवार हाफीज शेख यांनी सहकार्य केले या वेळी शिरूर ताजबंद येथील ग्राहकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
Related Stories
3 days ago