दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले आहेत. तसेच पाळत ठेवत असल्याने लोकनेते चव्हाण यांचा घातपात व अनुचित प्रकार घडू नये या आशयाचे निवेदन लोहा काँग्रेस समितीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. चौकशी करुन तात्काळ कारवाई करावी, यासह अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष काँग्रेस लोहा तथा उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार,
शहराध्यक्ष वसंत पवार, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, लोहा नगरपालिका गटनेते पंचशिल कांबळे, नगरसेवक शेख शरफुद्दीन, माजी नगरसेवक पंकज परिहार, अनिल दाढेल, काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष बाबासाहेब बाबर, पिंटू पाटील चुडावकर, अकबर शेठ, तालुका काँग्रेस कोषाध्यक्ष अंबेकर शिवाजी, बहुजन नेते गंगाधर महाबळे, शेख खलील, सत्तार शेख, भूषण दमकोंडवार, ज्ञानेश्वर बाबर, अमोल पाटील, रामचंद्र घुले, माधव पाटील आनकाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करत निवेदन दिले.