दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी नांदेड –
नांदेड :- यशवंत महाविद्यालय प्राणांगण नांदेड येथे कै.डॉ.शंकरराव चव्हाण साहेब आणि कै.कुसुमताई शंकरराव चव्हाण यांच्या स्मुर्तीप्रीत्यर्थ आयोजित कुसुम महोत्सव कार्यक्रमास शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे उपस्थित राहून महोत्सवाचा संपूर्ण आनंद घेतला यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब,माजी मंत्री डी पी सावंत, मा. आमदार अमरभाऊ राजूरकर,मा.आमदार हणमंत पाटील बेटमोरेकर,महापौर जयश्री ताई पावडे,मीनलताई खतगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाप्रसंगी लावलेल्या विविध स्टॉल ला भेटी देऊन त्यांना प्रोत्साहित केले याप्रसंगी कार्यक्रमाच्या आयोजिका माजी आमदार अमिताताई अशोकराव चव्हाण आणि मृणालीताई राजूरकर यांच्या हस्ते आशाताई यांना सन्मानित करण्यात आले.