
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर : मनीषा शिंदे मृत्यू प्रकरणात स्पष्ट अहवाल प्राप्त झाला असून या अहवालानुसार डॉ .ठक्करवाड हे मृत्यूस दो Rxषी जबाबदार असल्या कारणाने त्यांच्यावर भा.द.वि. ३०४ (अ)अन्वयेगुन्हा दाखल करण्यात आला आहे .
एकजुटी चा विजय : निष्पाप मनीषा शिंदे यांचा बेजबाबदार डॉक्टर मुळे मृत्यू झाला असल्या प्रकरणी देगलूर शहरातील सर्व समाज बांधव तथा देगलूर वासीया तर्फे मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळेच येथील उपजिल्हा रुग्णालय प्रशासन तथा पोलीस प्रशासनावर दबाव आला , आणि या एकजुटीमुळेच डॉ. ठक्करवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला .
दिनांक 16 डिसेंबर रोजी मनीषा शिंदे या प्रसूती व शस्त्रक्रियेसाठी देगलूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांना शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. या दरम्यान डॉ. ठक्करवाड यांनी मनीषा शिंदे कुटुंबीयांकडून पैसे घेऊन शस्त्रक्रिया केली . व बाहेरील मेडीकल मधून औषधे मागविली , या वेळी त्यांनी मनीषा शिंदे यांना तसेच ताटकळत ठेवले .यादरम्यान त्यांची प्रकृती ढासळली तद्नंतर मनीषा शिंदे यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. या सर्व प्रकारात डॉ . ठक्करवाड यांची भूमिका ही संशयास्पद राहिली असल्याची असल्याने कुटुंबीयांनी डॉ. ठक्करवाड यांच्यावर आरोप करीत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.
दरम्यान , देगलूर शहरातील समाजातर्फे , सर्व धर्म समुदाय तसेच देगलूरवासिया तर्फे देगलूर शहरांमध्ये डॉ .ठक्करवाड यांच्या निष्काळजीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती . यासंबंधी पोलीस प्रशासनातर्फे चौकशी करून अहवाल मागविण्यात आला या अहवालानुसार डॉ .ठक्करवाड हेच मनीषा शिंदेच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे अहवाल प्राप्त झाले त्यानुसार त्यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार ३०४ ( अ ) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
यावेळी माजी नगरसेवक सुशील देगलूरकर व भाजप युवा मोर्चाचे अशोक कांबळे यांनी पाठपुरावा करून तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस उप जिल्हाअधिक्षक सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जलद गतीने पार पाडली .
यानंतर पुढे मनीषाताई यांच्या लहान व नवजात मुलाच्या पूढील भविष्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह विविध संस्था व पुढाऱ्यांना भेटणार असल्याचे ही माजी नगरसेवक सुशील देगलूरकर व भाजप युवा मोर्चाचे अशोक कांबळे यांनी सांगीतले
देगलूर शहरात डॉ. ठक्करवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याने देगलूर शहरातील गरीब व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला असून बेजबाबदार डॉक्टरांवर कार्यवाही झाली असल्याने बेबंद डॉक्टरशाहीस व उपजिल्हा रुग्णालयातील सुस्त प्रशासनावर आता लगाम बसणार असल्याची चर्चा देगलूर शहरात होत आहे.