दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-आयुष्याची आठ दशके संपली, देशसेवा करून सेवानिवृत्ती घेतली, तरीही गावातील चांगल्या कामासाठी पुढाकार घेणारे कॅप्टन तात्यासाहेब सूर्यवंशी गावातील महत्त्वाच्या छोट्या मोठ्या कामात पुढाकार घेतात, यांचा गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करून त्यांच्या उर्वरित आयुष्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
आत्ताच्या स्थितीत भूम तालुक्यात सर्वात ज्येष्ठ देश सेवेतील सेवानिवृत्त कॅप्टन आष्टा येथे आहेत, आष्टा गाव राजकीय पटलावर अग्रेसर आहे, गावातील जनता सजग आहे, गावाची सर्वांगीण गुणवत्ता चांगली आहे, सातत्याने नवनवीन उपक्रम या गावात राबवले जातात, सेवानिवृत्त सैनिकांची मिरवणुकीतून गावात स्वागत केले जाते, त्याच पद्धतीने देश सेवा करून सेवानिवृत्त होऊन गेल्या अनेक वर्षापासून गावातील प्रत्येक कार्यात सक्रिय असणारे आणि वयाची आठ दशके ओलांडली तरीही सातत्याने ते महत्त्वाच्या कामात अग्रेसर असणारे कॅप्टन तात्यासाहेब सूर्यवंशी यांचा असंख्य माजी सैनिक आणि गावकऱ्यांनी 80 वा वाढदिवस साजरा करून त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे –
शनिवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी आष्टा तालुका भूम येथील ऑ कॅप्टन तात्यासाहेब रामचंद्र सूर्यवंशी यांचा आज 80 वा वाढदिवस माजी सैनिक सामाजिक बहुउद्देशीय संघटनेतर्फे भूम तालुक्यातील आष्टा येथे विठ्ठल मंदिरात साजरा करण्यात आला, त्यावेळेस त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या, केक कापून हार, गुच्छ देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी तालुकाध्यक्ष:- हेमंत देशमुख, सचिव प्रभाकर हाके, कार्याध्यक्ष पोपटराव जाधव, दासराव पवार, दादाराव पवार , दत्तात्रय गिलबिले, सुदाम शेलार, अंकुश भाऊगिर गोसावी , कुंडलिक बरडे , दासराव पवार , स्वराज्य संघटनेचे शाखा प्रमुख किरण गिलबिले, ग्रा.पं. सदस्य तात्यासाहेब अष्टेकर , तानाजी गिलबिले, संभाजी गिलबिले , सूर्यवंशी परिवार , आष्टा ग्रामस्थ यांचेसह असंख्य माजी सैनिक त्यावेळेस हजर होते. त्यांनी 81 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य देवो.हिच परमेश्वराकडे प्रार्थना सर्वानी केली आहे.