दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील एका परिसरातून अचानक गायब अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तक्रार गुदरली होती. प्रकरणाचे गांभीर्य व नुकताच घडलेला प्रकार ध्यानी घेऊन याचा छडा लावण्यासाठी कर्तव्यावरील पोलिसांनी पूरती कंबर कसली होती. रेल्वेची वेळ उमगताच पोलिसांनी गाठला थेट रेल्वे परिसर. शिताफीने ठेवलेली पाळत सार्थकी लावायचीच या इर्षेने तपासाला लागलेल्या यंत्रणेला या जोडप्याची भणक लागताच पाठलाग करायला झाले ली कुच निदर्शनास आली आणि म्हणूनच त्या जोडप्याने सुध्दा अगदी सिनेमातल्या “सैराट” ची पुनरावृत्ती परभणी रेल्वे स्थानक परिसरात घडल्याचे भयाण दृष्य आढळून आले. हातात हात घालून पुढे पळणारं ते जोडपं अन् त्यांना ताब्यात घेण्यासाठी पाठलाग करणारे पोलीस, अचानक असं काय घडतंय म्हणून अवाकपणे बघणारे नागरिक कमालीचे चिंताग्रस्त बनले गेले होते. हे सारे दृष्य बघून खरोखरच सैराट ची पुनरावृत्ती होतेय अशी परिस्थिती मात्र दिसून आली. अखिरकार पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेऊन थेट नानलपेठ ठाणे गाठले.
शहरातील वांगी रोड परिसरातील विश्वास नगर नावाच्या वस्तीत राहणारी ती अल्पवयीन मुलगी. वय वर्षे सतरा असूनही ती मित्राच्या संगतीने गायब झाली. यांची कुणकुण लागताच पालकांनी पण क्षणार्धात पोलीस ठाणे गाठले. परिस्थितीचे गांभीर्य ध्यानी घेऊन पोलिसांनी पण अधिक वेळ न दवडता थेट रेल्वे परिसर गाठला. ओळखजन्य पुरावे हाती पडताच कर्तव्यावरील पोलिसांनी शिताफीने सापळा रचला होता. पोलिसांपेक्षाही शातीर नजर आणि कृतीत माहिर असलेला तरुणीला घेऊन पोबारा करणारा पिल्या बाबुराव केळकर याच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
दरम्यान आईच्या तक्रारी नंतर पोलिसांनी वेळ न दवडता क्षणार्धात दाखवलेली तत्परता, रचलेला सापळा, पाठलाग करुन घडलेला तो सैराट या सर्व बाबी कौतुकास्पद अशाच म्हणाव्या लागतील. अन्यथा त्या कोवळ्या मुलीला घेऊन तो पिल्या केळकर पोलिसांच्या ही हातावर तूरी देवून कधीच पसार. झाला असता हे निश्चित. एकूणच या द.ष्याने परभणीत सैराट ची पुनरावृत्ती झाल्याचे अनेकांनी बघितले एवढे नक्की.