दैनिक चालू वार्ता पुणे प्रतिनिधी: संभाजी पुरीगोसावी
राज्यांत सध्या दिवाळीपासून ते आज अखेर पर्यंत आयएएस अधिकारी व आयपीएस तसेच राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना चांगलाच सरकारकडूंन बिगुल वाजला आहे. मात्र शिंदे-फडवणीस आज अखेर पर्यंत सरकारकडूंन अनेक जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र तथा विरोधी पक्षांचे नेते अजित दादा पवार यांच्या मर्जींतील पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे मात्र अजूनही पुण्यातच आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यांचे तत्कालीन जिल्हाधिकारी १७ ऑगस्ट २०२२ मध्ये जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयांत उपसचिव या पदावर नियुक्ती झाल्यानंतर या रिक्त पदावर देशमुखांनी पुणे जिल्ह्यांची सूत्रे स्वीकारली होती. मात्र देशमुख यांचा कालावधी पूर्ण होऊही देशमुख यांच्या बदलीचा मात्र शिंदे फडवणीस सरकारला चांगलाच विसर दिसतोय असे तर म्हणण्यांत काही वावगे ठरणार नाही ना? मात्र मागील काही दिवसांपासून देशमुख यांच्या बदलीची मात्र चर्चां चांगलीच रंगत होती. पण अजूनही देशमुख पुण्यांच्या जिल्हाधिकारी पदावर आहेत. डॉ.राजेश देशमुख हे सन २००८ तुकडीतील आयएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वीं सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून देखील काम पाहिले आहे. सातारच्या कार्यकाळानंतर देशमुखांची यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनांच्या पहिल्याच लाटेमध्ये त्यांनी पुणे जिल्हाधिकारी या पदाची सूत्रे हाती घेतली होती. डॉ. राजेश देशमुख हे अजित दादा पवार यांच्या मर्जीतील अधिकारी असून. हाच तर विषय शिदे-फडवणीस सरकारच्या समोर येत तर नसेल ना? का देशमुख यांच्या बदलीबाबत राजकीय विषय चांगलाच समोर येत आहे. त्यामुळेच डॉ. राजेश देशमुखांच्या बदलीचा निर्णय दिसून येत नाही.