दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी – समीर मुल्ला
हालाकिच्या परिस्थितीमुळे डी.एड शिक्षण अर्धवट सोडून पोलीस खात्यात कळंब पोलिस ठाण्यात उत्तम कर्तव्य बजावणारे महिला पोलिस नाईक प्रतिभा मते
मुळचे चिखली ता जि.धाराशिव (उस्मानाबाद) येथील अल्प भूधारक शेतकरी असलेले व घरची परिस्थिती बेताची असलेले भरत मते यांना १ मुलगा आणि २ मुली अल्प भूधारक शेतकरी असलेले मते यांची मोठी मुलगी प्रतिभा ही लहान पणा पासून खूप हुशार आणि चंचल प्रतिभा ला लहान पणा पासून खो खो खेळात रस होता. त्याचे प्राथमिक शिक्षण चिखली गावात जिल्हा परिषद शाळेत झाले १० वी व १२ वी उस्मानाबाद येथे श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे पुर्ण झाले १२वी मध्ये प्रतिभा ला ८४% गुण होते घरची परिस्थिती बेताची असल्याने पुढे सोलापूर येथे मेरी बी हार्डीग शासकीय अध्यापक विद्यालयात D.ed करण्याचे ठरवून प्रवेश मिळविला परंतु प्रतिभा ही खो खो खेळात चॅम्पियन असल्याने त्याने राष्ट्रीय स्तरावर ४ सुवर्ण, १ब्राॅंझ पदक मिळवित प्रतिभा क्रीडा क्षेत्रात सुवर्ण नाव कोरले पण उराशी पोलिस होण्याचे स्वप्न आणि हालाकिच्या परिस्थितीमुळे प्रतिभा २०१० मध्ये पहिल्या प्रयत्नात धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात पोलिस दलात दाखल झाल्या पोलिस दलात १३ वर्षे सेवा बजावत असताना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी उत्तम सेवा केली पोलीस मुख्यालय धाराशिव (उस्मानाबाद ) वाहतूक शाखेत,परंडा पोलीस स्टेशन,आणि सध्या कळंब 4 वर्ष झाले. सध्या पोलीस ठाणे कळंब येथे पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहेत तसेच पोलीस काका पोलीस दीदी पथक व पिंक पथकामध्ये ही प्रतिभ मते उत्तम कामगिरी करत आहेत यास त्याचे पती आशिष वायचळ सह आई वडील सारखे सासू सासरे दिर व बहिणी सारखी जाऊ हे पोलिस खात्यात नोकरी करीत करताना खंभीर पण पाठी शी उभे रहुन साथ देत आहे
समाजामध्ये मुलींना शिकायचे असेल तर त्यांनी स्वतःच्या पायावर अगोदर उभे राहायला शिकावे , अबला म्हणून जगण्यापेक्षा सबला म्हणून जगावे आणि आई वडिलांनी पण त्याच्या मुलींना आणि मुलांना ही समाजात वागताना एक चांगला नागरिक म्हणून त्यांची कर्तव्य काय आहेत हे समजावून सांगावे कारण मुलांचा पहिला गुरु हे त्यांचे आई वडील असतात
प्रतिभा मते
महिला पोलिस नाईक
कळंब पोलिस स्टेशन
कळंब ता कळंब जि धाराशिव (उस्मानाबाद)