दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी – समीर मुल्ला
अस बोलल जात कि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याच्या पत्नी अर्धांगिनी असते परंतु जर एखाद्या यशस्वी महिले च्या पाठीमागे त्याच्या पती ची साथ असली तर
पोलिस म्हटले की कायदा व्यवस्था राखताना स्वतः चे घर परिवार सोडून कर्तव्य बजावावे लगते घरची परिस्थिती मुळे आणि बघितलेले स्वप्न पूर्ण करायचे तर सर्व काही सोडून देण्याची वेळ येते आणि घरच्यांची साथ मिळाली कि ते साकार होते ही कथा आहे महिला पोलिस नाईक सायमा मोमीन यांची
मुळेवाडी ता. जि.उस्मानाबाद येथील अल्प भूधारक गरीब शेतकरी कुटुंब 4 मुली व १ मुलगा वडील शेतकरी शिक्षणाचा फारसा गंद नाही 4 बहीणी पैकी तरी सायमा ही अत्यंत हुशार पण वडील अल्प जमीन कसून 5 मुलांच सांभाळ करत सायमा हुशार आणि लहान पणा पासून पोलिस होण्याचे स्वप्न होते परंतु वडीलांची हालाकिची परिस्थिती पण सायमा च्या अंगी असलेली चंचलता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती कला शाखेत दुतीय वर्षा पर्यंत अर्ध शिक्षण केले पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवले २००५ साली पोलिस होण्यासाठी उस्मानाबाद पोलीस मैदानात उतरली यात त्याला अपयश आले
परंतु आई -वडील सह त्यांचे पती ईनायत मोमीन हे वारंवार प्रोत्साहन देत नंतर २००६ साली नांदेड येथील पोलिस भरतीसाठी मैदानात उतरली तेथे ही यश आले नाही हार न मानता सायमा वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून परत जोमाने तयारी केली शेवटी २०१० मध्ये सायमा यास यश आले.
उस्मानाबाद पोलीस दलात काम करत असताना सायमाने उस्मानाबाद शहर पोलिस स्टेशन, वाहतूक शाखेत, बिनतारी संदेश विभाग, आदी ठिकाणी उत्तम कामगिरी करत उस्मानाबाद पोलीस दलात नाव लौकीक केले. कळंब येथे कोर्टात कर्तव्य बजावत असताना उत्कृष्ट पैरवी कामगिरी केल्याबद्दल कळंब न्यायालयाचे तात्कालीन न्यायाधीश श्री. उबाळे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले .
सायमा यांना निखत आणि नुजत या दोन जुळ्या मुली आहेत. सायमा ह्या चोवीस तास पोलिस डिवटी करत एक उत्तम आई आहेत. सायमा यांना त्यांच्या आई -वडील बरोबर व त्यांचे पती इनायत मोमीन हे प्रोत्साहन लाभत आहे