दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
खाकी वर्दीमधील कोणताही अधिकारी डोळ्यासमोर आणला तर बिंधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आपल्याला डोळ्यासमोर येते. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिदवाक्य डोळ्यासमोर ठेवू आपली जबाबदारी पार पडणाऱ्या पोलीस महिला अधिकाऱ्यांबद्दल व कर्मचारी बद्दल प्रत्येकाच्याच मनात आदराची भावना असते.
कोरोना च्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्य पलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले त्या स्त्रीशक्तीचा सन्मान व गौरव करण्यासाठी हा थोडासा प्रयत्न…
महाराष्ट्र पोलीस खात्यातील स्त्रीशक्तीचा लेखणीतून कार्याचा यथोचित सन्मान करणं गरजेचं वाटत.
ही प्रेरणादायी स्टोरी आहे एका मुस्लिम समाजातील हिजाब् चा सन्मान करत खाकी वर्दी मध्ये काम करणाऱ्या तस्लीम चोपदार यांची….
०७ ऑगस्ट १९८५ रोजी एका सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबामध्ये खाकी वर्दीतील नवदुर्गेचा जन्म झाला. शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. शिक्षणासाठी वडील एस टी मध्ये चालक असल्याने त्यांना फार अस काही करता आले नाही. कसे बसे त्यांनी B.Sc पुर्ण केली. कालांतराने लग्नासाठी स्थळ येऊ लागली. परंतु समाजसेवेची ओढ सामाजिक जबाबदारीतून नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास कणखर असलेल्या तस्लिम चोपदार यांना पोलीस खात्याची आवड लहान पणापासूनच होती. परंतु मुस्लिम समाजात महिला असल्याकारणाने नोकरीबाबत विशेष असे प्रोत्साहन कधीच कुणी दिले नाही किंवा त्यांना इतरांकडूनही अशी संधी मिळाली नाही.
परंतु मुलीच्या हट्टापायी त्यांचे वडील अजिजखान चोपदार हे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. समाजाची पर्वा न करता त्यांनी आपल्या मुलिला येणाऱ्या प्रत्येक अडचणीच्या डोंगरावर चढायला तयार केल. सन 2008 मध्ये पोलीस खात्यामध्ये चोपदार या भरती झाल्या. हिजाब् बरोबर त्या आपल्या खाकी वर्दिवरही प्रेम करू लागल्या. कामावर रुजू झाल्यापासून ते आज पर्यंत त्या समाजाप्रती असलेली सामाजिक जबाबदारी व नैतिक जबाबदारी समजून 24 तास ओन ड्यूटी बजावताना दिसतात.
सप्टेंबर 2011 रोजी लतीफ सय्यद यांच्याशी विवाह झाला. सुरुवातीस पती कसे असतील? सासरचे लोक कसे असतील? त्यांना नोकरी बद्दल काही अडचण असेल का? चालू असलेली नोकरी बंद तर करावे लागणार नाही ना? असे मनाला रुकरूंक लावणारे एक ना अनेक प्रश्न त्यांना सतावत होते. परंतु पहिल्या दिवशी पासूनच त्यांच्या या खाकी वर्दी ला सासरच्यांनी कधी विरोध केला नाही. पहिल्या दिवसापासून ते आज पर्यंत च्या सेवेत त्यांनी चोपदार यांना आधार देऊन त्यांच्या आत्मविश्वासात भर टाकली. सध्या त्या कळंब तालुक्यातील येरमाळा गावाच्या बीट अमलदार म्हणुन काम अतिशय चोख पणे करत आहेत. ना ना तऱ्हेच्या तक्रारी त्या स्वतः हुन लक्ष देऊन सोडवतात. त्यांची येरमाळा मध्ये लेडी सिंघम अशी ख्याती आहे.ऑन ड्युटी चोवीस तास काम करत असताना या 24 तास ड्युटी बरोबरच त्या एक आई देखील आहेत. त्या कामावर असताना मुलांना पती व सासुबाई यांचा सांभाळ देखील योग्य पद्धतीने करतात. जनसेवे मध्ये नेहमीच सज्ज असलेल्या महिला पोलीस खाकी वर्दीतील तसलीम चोपदार (सय्यद ) या आपल्या कुटुंबाकडे पूर्णपणाने लक्ष सुद्धा देऊ शकत नाहीत किंवा सन उत्सव आपल्या
आपल्या परिवाराबरोबर साजरे करू शकत नाहीत याची त्यांना रुखरुख वाटते. तरीही खाकी फर्स्ट हे ब्रीद वाक्य मनाशी बाळगुन त्या सध्या आपले कर्तव्य करत आहेत.