दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर येथील तहसील ऑफिस मध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून या पदाची एकदिवसीय जबाबदारी पेशकार महिलांवर सोपवून अनोख्या पद्धतीने हा दिवस तहसील कार्यालय देगलूर येथे साजरा करण्यात आला.
महिलांच्या हक्कांकडे लोकांचे लक्ष वेधून त्यांना जागरूक करण्याच्या उद्देशाने महिला दिनानिमित्त अनेक वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून तहसीलदार राजाभाऊ कदम व नायब तहसीलदार बालाजी मिठ्ठेवाड यांच्या पुढाकारातून एका अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला गेला.
तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी शुभांगी जोशी यांना तहसीलदार, मंजूषा रापतवार, पूनम बलुले, हवेलीकर, सुचिता मारकवाड
यांना नायब तहसीलदार, तर माधुरी शिरसाठ यांना अव्वल कारकुनाची जबाबदारी सोपवून कामकाज पार पाडण्यासाठी प्रोत्साहित केले. दरम्यान, महिला दिनाचे औचित्य साधून माझ्यासह इतर महिलांचा सन्मान करीत तहसीलदार या पदावर मला काम करण्याची संधी मिळाल्याने माझ्यासाठी हा सुखद आनंदाचा क्षण असल्याचे एकदिवसीय तहसीलदार झालेल्या शुभांगी जोशी यांनी सांगितले.