दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले.
लातुर/अहमद्पुर: तालुक्यातील येलदरी या छोटयाशा गावातील डॉ. राधिका सुलोचना पाटलोबा मुंढे या मुलीने एम.आय.टी.डेंटल कॉलेज लातुर येथुन बी. डी. एस.ही डॉक्टरेट पदवी मिळवली .लातुर येथे आयोजित 2017ते 2022 बी.डी.एस.पदवी वितरण समारंभात प्रमुख पाहुणे डॉ. विठ्ठल लहाने सर यांच्या हस्ते पदवी वितरीत करून सन्मान करण्यात आला.त्याच बरोबर राधिकाच्य कुटुंबियांचा,आणी राधिकाचे गुरु श्री बसवराज बाळुरे सर यांचा पण सन्मान करण्यात आला.अतिशय डोंगराळ,ग्रामीण खेड्यातील विद्यर्थिनीने मिळवलेल्या या यशा बद्दल तिच सर्वत्र कौतुक होत आहे.साने गुरुजी विद्यालय येस्त्तार येथुन प्राथमिक च शिक्षण राधिकाने पूर्ण केले तिच्या जडण घडणीत येस्त्तार च्या सानेगुरुजी विद्यालयाचा खूप मोठा वाटा आहे असे तिच्या बोलण्यातून जाणवले.अफाट मेहनतीच्या,जिद्दीच्या बळावर मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व शिक्षक,बिरादार सर,बाळुरे सर,बनसोडे सर,वनीता मॅडम,मठपती सर ,तुमरामसर,तिचे सर्व गुरुबंधु, मित्र,मैत्रिणी,तिचे गावकरी गुरु शिष्य संवाद ग्रुप, यांनी तिच्या यशा बद्दल तिचे कौतुक केले आणी भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.