
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
अनेक आठवणीना उजाळा देत सर्वसमावेशक नेतृत्व,राष्ट्रभक्त दिवंगत अलिशेट कौचाली यांना खासदार सुनिल तटकरे यांनी वाहीली शोकसभेत भावपुर्ण आदरांजली.
आमदार आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्या राजकीय जीवनातील पाया अलीशेट कौचाली होते.”
“अंजुमन को सजाकर बड़े शौक़ से
सबको तनहा वो करके चला ही गया —–
म्हसळा – दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी म्हसळा तालुका पांगलोली निवासी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक अलीशेट कौचाली यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या अकाली निधनाने जनमानसात दुःखाचे सावट पसरले आहे.दिनांक ११ मार्च रोजी म्हसळा घनसार कॉम्प्लेक्स सभगृहात दिवंगत अलीशेट यांना श्रधदांजली वाहण्यासाठी सर्व पक्षीय शोकसभा आयोजीत करण्यात आली होती या शोकसभेत खासदार सुनिल तटकरे यांनी १९८४ साली वडिलांचे निधन झाले तेव्हा माझे दुःखात आणि मागील ४० वर्षा पासुन सामाजिक,राजकीय क्षेत्राचे जडणघडणीमध्ये सावली सारखा पाठीमागे उभा राहणारा सर्वसमावेशक नेतृत्व,राष्ट्रभक्त अलीशेट कौचाली यांचे निधनाने माझी हानी होऊन मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती त्यांचे नसण्याने कधिच भरून निघणारी नाही याचे दुःख माझे मनात कायम टोचत राहील याचे दुःख व्यक्त करताना त्यांचे कार्य कुशलतेच्या अनेक आठवणीना उजाळा देत आज आमदार आदिती आणि आमदार अनिकेत यांचा राजकीय पाया अली शेट यांनीच रचल्याची माहिती देताना आदीती आणि अनिकेत यांना राजकारणात न आणण्याचा माझा मनोदय असताना त्यांच्यात नेतृत्व गुण आहे हे ओळखुन त्यांना संधी उपलब्ध करून द्या असे सांगणारे अलीशेट होते याची आठवण खासदार तटकरे यांनी शोक सभेत करून दिली.स्वतःला दुय्यम भूमिकेत ठेवणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.ते आता प्रत्यक्ष रुपी आपल्यात नाहित हे जरी सत्य असले तरी ईश्वर लिखित होणाऱ्या घटनाचा स्वीकार करून त्यांना ईश्वर चरणी सद्गती लाभो अशी खासदार सुनिल तटकरे यांनी प्रार्थना करून भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.आयोजीत शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर ऊर्फ दाजी विचारे,इकबालशेट धनसे,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,स.पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे,नायब तहसीलदार श्री.तेलंगे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,नगराध्यक्ष असहल कादिरी,उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,जीप माजी सभापती बबन मनवे,कुणबी समाज नेते महादेव पाटील,माजी सभापती नाझीम हसवारे,एन.के.जाधव,भाई दफेदार,मुब्बशिर जमादार सर,शाहीद उकये,शेकापचे निलेश मांदाडकर,सरपंच अनंत नाक्ती,नवाब कौचाली,महीला अध्यक्षा सोनल घोले,माजी सभापती छाया म्हात्रे,रेश्मा कानसे,शगुप्ता जहांगीर,मीना टिंगरे, सरपंच वनिता खोत,चंद्रकांत कापरे,अनिल बसवत,सतिश शिगवण,महेश घोले,किरण पालांडे,प्रकाश गाणेकर,शेखर खोत,बाळकृष्ण सावंत आदी मान्यवर सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वरील उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेते अली शेट कौचाली यांच्या मधील माणूसपण आणि त्यांचा सहवास,त्यांचे सर्वसमावेशक कार्य कर्तुत्वाची आठवण करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.