दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
कंधार — संपूर्ण जग तिच्या कंगनात बसले ,
तिच्या भरारीने नवे ही छोटे भासले
करा तिचा सन्मान हा प्रत्येक क्षणी
वंदन त्या स्त्रीशक्तीला या महिला दिनी
आदरणीय व्यासपीठ
मी वर्षा वामन कुलकर्णी आज आपल्यापुढे उभे आहे .
आज हे जे प्रदर्शन भरले आहे त्यामागे खूप मोठे कारण आहे . कंधार येथील महिलांना व्यावसायिक दृष्ट्या पुढे घेऊन जाण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे .असे बरेचसे कार्यक्रम वर्षातून महासंघातर्फे चार-पाच वेळेस सणा उत्सवाच्या माध्यमातून घेतले जातात . मग तो तिळगुळाचा कार्यक्रम असो , हळदी कुंकवाचा कार्यक्रम किंवा असे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा बीसी , बचतगटाच्या माध्यमातून असे अनेक कार्यक्रमाचे नियोजन संघामार्फन केले जाते हे आपणास ज्ञात आहे . त्यामध्ये हा एक कार्यक्रम आहे .
जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी,
त्या विश्व शक्तीचे नाव आहे नारी ,
तीच आहे सर्जनाची निर्मिती ,
तिच्यामुळेच तेवतात दिव्याच्या वाती ,
चहुकडे प्रकाश देऊन ती जगतास उधारी .
त्या विश्व शक्तीचे नाव आहे नारी .
म्हणून आजची नारी ही काही कमी नाही , ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो . याप्रमाणे प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही तरी कौशल्य आहे .संसाराच्या ओझ्याखाली ते कुठेतरी दाबले गेले आहे . म्हणून दाबलेले कौशल्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून वर काढण्याचा प्रयत्न करत आहोत . आपली आर्थिक स्थिती पाहता सर्व सामान्य माणसाचे आर्थिक वेळापत्रक कोलमडत आहे .महागाई कळसाला वाढली आहे . अनेक समस्यांना आपणाला तोंड द्यावं लागतं .आणि जर आपल्या मैत्रिणीकडून एखादा व्यवसाय आपण शिकला तर आपणाला त्याची खूप मदत होईल .आणि आपल्या घरी चार पैशाची मदत सुद्धा होईल . म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . खरे तर हाकार्यक्रम यशस्वी करण्या पाठीमागे काही एकटीचे काम नाही . अनेक महिलांचा यात समावेश आहे .म्हणून हा कार्यक्रम एवढ्या यशस्वी पद्धतीने पार पडत आहे .
मार्ग कठीण होता परी तू कधी न खचली ,
उगवत्यासूर्या समान तू सदा चमकली ,
अलंकार शौर्याने देऊन अशी तू सजली ,
तुझ्या पराक्रमाला पाहून दुनिया ही दिपली .
आपला पराक्रम दाखवण्याची वेळ आता आली आहे .या कार्यक्रमाच्या विविध वस्तू प्रदर्शनात त्यानंतर व्यवसाय कसा केला जातो . हे या प्रदर्शनातून पाहण्यात आले . स्त्री मूळातच व्यवहारिक असते ,बचत करणारी असते , आणि म्हणूनच स्त्रीच्या हाती आर्थिक व्यवहार येणे हे गरजेचे आहे . यापुरुष प्रधान मध्ये संस्कृतीमध्ये हे होऊ दिल जात नाही . म्हणून स्त्री आपल्या पायावर भक्कम पद्धतीने उभे राहण्याची गरज आता भासू लागली आहे .
पैसा आहे तर सर्व काही आहे . पैसा आहे तर मानपान आहे . पैसे आहेत तर सर्वच काही आपणाला मिळतं .
म्हणून हजारो फुल चाहिये एक मला बनाने के लिए
हजारो दिपक चाहिये एक आरती सजाने के लिए
हजारो बुंद चाहिये एक सागर बनाने के लिए
पर एक ‘स्त्री ‘अकेली ही कॉफी है घर का स्वर्ग बनाने के लिए .
आणि निश्चितच हा स्वर्ग तयार करूया . या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्रित आलात त्याबद्दल मी अखिल भारतीय ब्राह्मण महिला महासंघ यांच्यातर्फे सर्वांचे मी आभार मानते आणि जाता जाता एवढंच सांगते .
मातृत्व , नेतृत्व आणि कर्तृत्व या गुणाचा संगम असणारी , निसर्ग देणगी लाभलेली महान शक्ती म्हणजे नारी शक्ती .
नारी आता आबला नाही ,
संघर्ष आमचा चालू राही .
धन्यवाद .
सौ. वर्षा कुलकर्णी, कंधार