दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
.
कंधार येथील नगरेश्वर गल्ली सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी महिला दिनानिमित्त वस्तू प्रदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमात ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्ष सौ .वर्षा मंगेश कुलकर्णी ( कुरळेकर ) यांनी आयोजित केला होता .या कार्यक्रमांमध्ये त्यांनी आजची स्त्री ही आर्थिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे . त्याचबरोबर ही महिला अबला नसून पुरुषाच्या बरोबरीने कार्य करणारी सबला आहे .आपल्या छोट्या -छोट्या व्यवसायातून आपली प्रतिमा समाजापुढे मांडत आहे . आणि आपल्या संसारात ती मदत करत आहे .असे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या बोलत होत्या . या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती श्यामा दंडवते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वडजकर मॅडम होत्या . तसेच जयमंगला औरादकर ह्या होत्या याप्रसंगी .पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले आई तुळजा भवानी मातेच्याप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . या कार्यक्रमात आरती शास्त्री ,लाटकर सुप्रीया ,सिंधू आलेगावकर , शुभांगी महाराज , रूपाली धोंड ,भाग्यश्री जोशी , रेखा व्यास , अपर्णा गांजरे , पाठक रूपाली , विजया कुलकर्णी , मनीषा पांडे ,सराफ काकू ,ऐश्वर्या महाराज , अरुणा महाराज , शितल आलेगावकर , दिपाली व्यास ,लक्ष्मी शास्त्री , विजयाबाई जोशी , हेमा धर्मापुरीकर , गुंटूरकर मॅडम , लालवंडीकर मॅडम , या उपस्थित होत्या तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री जोशी यांनी केले , तर आभार प्रदर्शन आरती शास्त्री यांनी केले .या कार्यक्रमाची संगीत उखाण्यातून सांगता झाली .