दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुरंदर / पुणे : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै विनायक सर्जेराव ताकवले याचं ( दि 18 ) शनिवारी दीर्घ आजाराने वयाच्या 99 व्या वर्षी दुःखद निधन झालं.
जेष्ठ स्वातंत्र सैनिक कै. विनायक सर्जेराव ताकवले एक चळवळी मधील खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची पुरंदर मध्ये चांगली ओळख होती.
तसे विनायकराव हे एक शिक्षक होते. आणि त्यांनी शिक्षक म्हणून आपली जबाबदारी सांभाळताना हजारो विद्यार्थ्यांना घडविले.
शिक्षक संघटनेचे अध्यक्ष ,त्यांच्या पुरंदर तालुक्यात ज्येष्ठ नागरिक म्हणून मानसन्मान वेळोवेळी मिळायचा. लोकांच्या प्रति त्यांच्याबद्दल एक चांगला आदर होता.
त्यांच्या पश्चात चार मुलं आहेत व त्याचं कुटुंब . शिक्षणावर त्यांचा खूप चांगला भर होता मुलांना त्यांनी खूप शिकवलं त्यापैकी एक मुलगा नायब तहसीलदार आहे व बाकी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत.
मूळचे शिक्षक असल्याने शिस्तबद्ध आणि लोकांसाठी किंवा एक परिवारासाठी चांगली वागणूक त्यांच्याकडून कायम भेटायची आणि शिक्षक संघटनेत राहून काही दिवस काम केले आहे. पुरंदरमध्ये जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणून चांगला परिचय होता व वयाच्या 99 त्यांचे दीर्घ आजाराने त्याचं निधन झाले . त्यांच्या जाण्याने पूर्ण हरगुडे गाव हळहळलं.
त्याच्या पश्चात चार मुलं व चार सुना , नातू, पंतु असं मोठं कुटुंब आहे.
उसळलेला जनसागर.. लक्ष लक्ष नयनांतून ओघळणारे अश्रूयांनी जेष्ठ स्वतंत्र सैनिक कै. विनायक सर्जेराव ताकवले यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.