दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- गेल्या आठ वर्षापासून अहमदपूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेले संकल्प नॅशनल स्कूल येथे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच अहमदपूर वासीयांच्या उदंड प्रतिसादातून नावारुपास आलेल्या संकल्प नॅशनल इंग्लिश स्कूल, अहमदपूर परिवाराकडून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आठवे वार्षिक स्नेहसम्मेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात चिमुकल्याने आपले विविध कलागुण व सुप्तगुण सादर केले.
या वेळी स्नेहसम्मेलनाचे उदघाटन गटशिक्षण अधिकारी श्री. बबनराव ढोकाडे साहेब, सौ. आयोध्याताई केंद्रे , भारतदादा रेड्डी , अमितभैय्या रेड्डी , तसेच प्रा.बुद्रूक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. घाळगीर एस.जी व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सौ. लोहकरे जे.एस , प्रा.लोहकरे एस.व्ही. हे होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. घाळगीर एस.जी यांनी केले.