दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर: राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हा अध्यक्ष नांदेड व माजी नगराध्यक्ष पदमवार सावकार आज देगलूर येथील तहसील ऑफिस समोर बसलेल्या जुनी पेन्शन संपाच्या ठिकाणी जाऊन भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला पदमवार सावकार म्हणाले आमदार खासदारांची पेन्शन बंद करा पण कर्मचाऱ्यांची पेन्शन योजना लागू करावी संपला माझा पाठिंबा आहे असे जाहीर केले. त्यांनी सांगितले भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आहे त्या त्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना ही लागू आहे .
पण बीजेपी सरकार हे नेहमी प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊन ही जुनी पेन्शन देण्यास टाळाटाळ करत आहे त्यासाठी मी या जुनी पेन्शन योजनेसाठी राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठांशी सतत पाठपुरावा करून जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्याला देईपर्यंत मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत राहील संपातील सर्व कर्मचाऱ्यांना माझा जाहीर पाठिंबा आहे असे सांगितले.