दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे:इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संतोष धनाजी बनकर व व्हा.चेअरमन पदी बाळासो तुकाराम जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आज निवडणूक अधिकारी पी.व्ही.हराळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चेअरमन पदासाठी संतोष धनाजी बनकर व व्हा. चेअरमन पदासाठी बाळासो तुकाराम जाधव यांचेच एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी पी.व्ही.हराळ यांनी चेअरमन पदी संतोष धनाजी बनकर व व्हा . चेअरमन पदी बाळासो तुकाराम जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी नवनियुक्त चेअरमन व व्हा चेअरमन यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते चेअरमन,व्हा.चेअरमन व सर्व नवनिर्वाचित संचालक यांचा विशेष सत्कार करण्यात आला, यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते बाळासाहेब करगळ,शेटफळ हवेली चे विद्यमान सरपंच संतोष पवार, सोसायटी चे माजी चेअरमन नंदकुमार शिंदे, माजी चेअरमन लक्ष्मण भोसले, माजी सरपंच अतुल शिंदे,ग्रा.पं.सदस्य महेश नरबट, माजी ग्रा.पं.सदस्य किशोर शिंदे, जैनुद्दीन मुलाणी, माजी पोलीस पाटील भिमराव आरडे, मच्छिंद्र शेळके, प्रगतशील बागायतदार शिरीष शिंदे, सुधीर शिंदे, आकाश कांबळे, बाळासाहेब चव्हाण, सचिन जाधव,संस्थेचे सचिव विजय नामदेव चव्हाण त्याच बरोबर सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ खालील प्रमाणे
संतोष धनाजी बनकर, बाळासो तुकाराम जाधव, पांडुरंग सोमा नरबट, गणेश विठ्ठल नवले, प्रकाश वेताळा सोलनकर, स्वप्निल बाळासो करगळ,सुधिर नारायण शिंदे, अजित दिपक जाधव, नारायण मारुती आरडे, भाऊराव लक्ष्मण सावंत, प्रथमेश रमेश पवार,संध्या अतुल शिंदे,गौरी शिरीष शिंदे.